प्रसिद्ध चॅनलकडून कॉपीराइट कायद्याचं उल्लंघन; TRP केसनंतर पुन्हा CEO संजय वर्मांना अटक

प्रसिद्ध चॅनलकडून कॉपीराइट कायद्याचं उल्लंघन; TRP केसनंतर पुन्हा CEO संजय वर्मांना अटक

सध्या अनेक वाहिन्या मुंबई क्राइम ब्रांचच्या निशाण्यावर आहे

  • Share this:

मुंबई, 19 जानेवारी : टीव्ही चॅनल महा मुव्हीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय वर्मा यांनी मुंबई पोलिसांनी एका नव्या प्रकरणात अटक केली आहे. संजय वर्मा यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी कॉपीराइट कायद्याचं उल्लंघन केलं. मंगळवारी मुंबई क्राइम ब्रान्चने त्यांची चौकशी केली आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. कॉपीराइट प्रकरणाचं उल्लंघन केल्याची तक्रार जुहू स्थित पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. (Violation of the law by another maha movies channel Sanjay Verma was also arrested)

आज (मंगळवार) सकाळी संजय वर्मा यांच्यासाठी नक्कीच चांगली नव्हती. मुंबई क्राइम ब्रांन्चची टीम अचानक त्यांच्या घरी पोहोचली आणि काही मुद्द्यांवरुन चौकशी केली. मात्र जेव्हा अधिकाऱ्यांच समाधान न झाल्याने क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी संजय वर्मा यांना अटक केली. सांगितलं जात आहे की, त्यांना कॉपीराइट प्रकरणाचं उल्लंघन करण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण क्राइम ब्रांचकडे ट्रान्सफर करण्यात आलं होतं.

हे ही वाचा-'आप'ला महाराष्ट्र! ग्राम पंचायत निवडणुकीत AAP ला लॉटरी; 50 टक्के जागांवर यश

संजय वर्मा यांना अटक करण्यात आलं असून त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. संजय यांच्यासाठी हे प्रकरण नवीन आहे. मात्र यापूर्वी टीआरपी हेराफेरीचं प्रकरण सुरू आहे. महा मूव्हीज, बॉक्स सिनेमा, फक्त मराठी आणि रिपब्लिक टीव्ही सारख्या काही चॅनल्स मुंबई क्राइम ब्रांचच्या निशाण्यावर आहे. या सर्व चॅनलवर टीआरपी प्रकरणात फसवणुकीचा आरोप आहे. सांगितलं जात आहे की, देशात कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनदरम्या या चॅनलची टीआरपी वाढली होती.

Published by: Meenal Gangurde
First published: January 19, 2021, 4:18 PM IST

ताज्या बातम्या