रात्री १० नंतर फटाके फोडलेत तर होऊ शकते 'ही' शिक्षा

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले गेले. सुप्रीम कोर्टाच्या या नियमाचं उल्लंघन करणारे अनेक जण होते. पण दिल्ली पोलिसांनी हळूहळू असं उल्लंघन करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवायला सुरुवात केली आहे. नियमबाह्य पद्धतीने फटाके उडवले तर काय शिक्षा होऊ शकते?

  • Share this:

फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणाची गंभीरपणे दखल घेत सुप्रीम कोर्टानं यंदा फटाके फोडण्यावर काही निर्बंध घातले आहेत.

 रात्री ८ ते १० या वेळातच फटाके फोडायची परवानगी सुप्रीम कोर्टानं दिली आहे. याशिवाय आवाजी फटाक्यावरसुद्धा निर्बंध आहेत.

 वकिलांच्या म्हणण्यानुसार फटाक्यांसदर्भात तक्रार आली, तर पोलीस भारतीय दंडविधानाच्या कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करतात.

हा गुन्हा जामीनपात्र आहे. पण याची केस कोर्टात चालवली जाऊ शकते. गुन्हा सिद्ध झाला तर ६ महिन्यांपर्यंत कारावास किंवा हजार रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात. देशभरात सुप्रीम कोर्टाच्या या नियमाचं उल्लंघन करणारे अनेक जण होते. पण दिल्ली पोलिसांनी हळूहळू असं उल्लंघन करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवायला सुरुवात केली आहे.

दिल्लीत अवैध रीतीने फटाके फोडणाऱ्या १०० जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नोएडामध्ये ३१ केसेस नोंदल्या गेल्या आहेत. शिवाय दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत ४०० किलो फटाके जप्तही केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2018 02:27 PM IST

ताज्या बातम्या