Home /News /national /

'या' शहरात कोरोना नियमांचा फज्जा, मध्यरात्रीपर्यंत डान्सबार सुरू

'या' शहरात कोरोना नियमांचा फज्जा, मध्यरात्रीपर्यंत डान्सबार सुरू

कोरोनाबाबत घालून दिलेल्या नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं चित्र मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये दिसून येत आहे. इथं मध्यरात्री उशिरापर्यंत डान्स बार सुरू राहत असून पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचं चित्र दिसत आहे.

    भोपाळ, 11 जुलै: कोरोनाची दुसरी लाट (Second wave of corona virus) ओसरत असली तरी कोरोनाचा प्रभाव अद्याप कायम आहे. त्यातच तिसऱ्या लाटेची (third wave) शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाबाबत घालून दिलेल्या नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं चित्र मध्यप्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) दिसून येत आहे. इथं मध्यरात्री उशिरापर्यंत डान्स बार (Dance bar) सुरू राहत असून पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचं चित्र दिसत आहे. बाजारपेठांना दंडुका, बारना मोकळीक कोरोनाबाबतचे नियम केवळ बाजारपेठेतील दुकानांपुरतेच पाळले जात असल्याचं चित्र आहे. बाजारपेठेतील वेगवेगळी दुकानं पोलीस ठरलेल्या वेळेत बंद करायला लावतात. मात्र मोठेमोठे बार, पब आणि डान्स बार यांच्यावर विविध राजकीय पक्ष आणि स्थानिक नेत्यांचा हात असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या बाबतीत मात्र काणाडोळा होत असल्याची तक्रार सर्वसामान्य जनता करत आहेत. सर्व हॉटेल्स आणि बार रात्री 10 वाजता बंद करावेत, असा नियम भोपाळमध्ये असताना मध्यरात्री 1 किंवा 2 वाजेपर्यंत या बारमध्ये धिंगाणा सुरू राहत असल्याची माहिती आहे. कोरोना नियमांचं उल्लंघन एरवी रस्त्यावर मास्क खाली घसरला तरी कारवाईचा दंडुका उगारला जातो, मात्र या डान्स बारमध्ये कुणीही कोरोनाबाबतच्या नियमांचं पालन करत नसल्याचं चित्र आहे. एकावेळी अनेकजण या बारमध्ये गर्दी करतात आणि कुणालाही मास्क लावण्याची सक्ती केली जात नसल्याचं दिसून आलं आहे. नागरिक पुढाऱ्यांच्या दहशतीखाली असल्याने कुणीही तक्रार करत नसल्याचंही चित्र आहे. काही नागरिकांनी पोलिसांना फोन करून तक्रार केल्यावर तोंडदेखली कारवाई केली जाते आणि दुसऱ्या दिवसापासून पुन्हा तेच चित्र दिसू लागत असल्याचा अनुभव नागरिक व्यक्त करतात. हे वाचा - पर्यटनस्थळी गर्दी करणं पडलं महागात, पुण्यात 400 जणांवर कारवाईचा बडगा जिल्हाधिकाऱ्यांचे पोकळ दावे फार्महाऊस आणि मोकळ्या जागांवर होणाऱ्या पार्ट्यांवर प्रशासनाची नजर असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं नेहमीचं ठोकळेबाज उत्तर देण्यापलिकडे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त काहीही कारवाई करत नसल्याचा आरोप होत आहे. अशा प्रकारचे बार सुरु राहिले, तर कोरोना नियंत्रणात कसा येणार, असा सवाल विचारला जात आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bhopal News, Coronavirus, Madhya pradesh

    पुढील बातम्या