मराठी बातम्या /बातम्या /देश /

अजबच! संचारबंदीत कुत्र्याला फिरायला नेलं म्हणून त्याच्यासह मालकाला तुरुंगवास

अजबच! संचारबंदीत कुत्र्याला फिरायला नेलं म्हणून त्याच्यासह मालकाला तुरुंगवास

इंदूरच्या पलासिया पोलीस ठाणे परिसरात एक युवक त्याच्या पाळीव कुत्र्याला घेऊन रस्त्यावरून फिरत होता. नेमकी पोलीस गाडी तिथे पोहोचल्याने पोलिसांनी नियम म्हणजे नियम असे सांगत मालकासह कुत्र्यालाही अटक केली.

    इंदूर, 06 मे : मध्य प्रदेशातील सर्वात मोठे शहर इंदूर (Indore Madhya Pradesh) येथे पोलिसांनी कठोर नियम पालनाचा विक्रम रचला आहे. सध्या याठिकाणी कोरोनामुळे संचारबंदी (Corona Lockdown) लागू झाली असून यादरम्यानच पलासिया पोलीस ठाणे परिसरात एक युवक त्याच्या पाळीव कुत्र्याला घेऊन रस्त्यावरून फिरत होता. नेमकी पोलीस गाडी तिथे पोहोचल्याने पोलिसांनी नियम म्हणजे नियम असे सांगत मालकासह कुत्र्यालाही अटक केली. पोलिसांवर असा आरोप होत असताना, पोलिसांनी मात्र हे वृत्त फेटाळलं आहे. पाळीव प्राण्यांना दिवसभरातून काही वेळासाठी तरी घराबाहेर मोकळ्या वातावरणात फिरायला न्यावे लागते. पाळीव प्राण्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांना शौच विधी करण्यासाठी ही बाब आवश्यक असते. संबंधित युवकाने पोलिसांना हे समजावून देण्याचा प्रयत्न केल्यानंतरही कुत्रा आणि त्याच्या मालकाला तुरुंगाची हवा खावी लागली. गंमत म्हणजे, या युवकाचे वडील पोलीस खात्यातच पोलीस उपाधीक्षक पदावर राहिलेले आहेत. अनित नड्डा असे या युवकाचे नाव असून तो स्वतःही स्थावर मालमत्ता व्यावसायिक आहे. हे वाचा - Bank Holiday: खोळंबा टाळण्यासाठी आज पूर्ण करा Banking संबंधित काम, उद्यापासून 3 दिवस बँका बंद पलासिया पोलीस ठाणे परिसरात अनित नड्डा त्यांचा कुत्रा जुजू याला फिरायला घेऊन निघाले होते. मात्र यादरम्यानच, आलेल्या पोलिसांनी संचारबंदीत कुत्र्यालाही फिरायला नेणे नियमबाह्य असल्याचे सांगत त्यांना ताब्यात घेतले. नंतर या तरुणाला ताकीद देऊन सोडून देण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. मीडिया अहवालांनुसार, कुत्रा आणि कुत्र्याच्या मालकाला तात्पुरत्या स्वरूपाच्या तयार केलेल्या तुरुंगाची हवा खावी लागली. दरम्यान, पोलिसांनी मात्र असे काही घडले नसल्याचे म्हटले आहे. हे वाचा - विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठं अपयश; कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली चिंता, म्हणाले… अशा प्रकरणी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याबाबत पोलिसांची स्वतःचीही एक बाजू आहे आणि माध्यमांनी दुसरी बाजूही मांडली आहे. तर, कुत्र्यांचे मालक, इतर पाळीव प्राणी प्रेमी आणि श्वानप्रेमी यांच्याकडून पोलिसांच्या अशा प्रकारच्या कारवायांना विरोध होण्याची शक्यता आहे. नियमांची अंमलबजावणी करताना पोलिसांनाही काही परिस्थितींमध्ये मानवतेचा विचार करून निर्णय घ्यावे लागणार आहेत. तर, काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने कठोरपणे कर्तव्य निभावावे लागणार आहे, हेच यावरून स्पष्ट होत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona spread, Coronavirus, Indore News

    पुढील बातम्या