• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • मुस्लीम धर्मगुरुंच्या अंत्यसंस्कारासाठी जमली तोबा गर्दी; कोरोनाचे नियम पायदळी, पाहा VIDEO

मुस्लीम धर्मगुरुंच्या अंत्यसंस्कारासाठी जमली तोबा गर्दी; कोरोनाचे नियम पायदळी, पाहा VIDEO

देशभरात एकीकडे कोरोनाचा संसर्ग (Corona in India) झपाट्याने वाढत आहे, तर दुसरीकडे, गुजरातमधून (Gujarat Corona Update) चिंता वाढविणारी काही छायाचित्रे समोर आली आहेत

 • Share this:
  अहमदाबाद, 09 मे: देशभरात एकीकडे कोरोनाचा संसर्ग (Corona in India) झपाट्याने वाढत आहे, तर दुसरीकडे, गुजरातमधून (Gujarat Corona Update) चिंता वाढविणारी काही छायाचित्रे समोर आली आहेत. शनिवारी गुजरातमधील कच्छ येथे धार्मिक मुस्लीम नेत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अंत्यसंस्कारासाठी एकत्र आलेल्या या लोकांनी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे सरळ-सरळ उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. अंत्यसंस्कारावेळी मोठी गर्दी होती आणि लोकांनी मास्क घातले नव्हते आणि सुरक्षित अंतर तर अजिबात पाळले गेले नसल्याचे दिसत आहे. देशात आणि गुजरातमध्येही कोरोना स्थिती गंभीर असताना अशा प्रकारची गर्दी कशी काय जमली? असा प्रश्न निर्माण होत आहे. गुजरातमधील कच्छच्या मांडवी येथे ही मोठी गर्दी झाली होती. एका मुस्लीम धर्मगुरूचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जनाजेसाठी लोक एकत्र आले होते. येथील गर्दीचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. दरम्यान, पोलिसांनीही या घटनेला दुजोरा दिला असून जनाजेमधील एक व्हिडिओ तेथीलच असल्याची खात्री केली आहे. रात्री उशिरा मुस्लीम धर्मगुरूंचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कारासाठी खूप मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते, असे सांगण्यात येत आहे. हे वाचा - VIDEO: होम आयसोलेशनमध्ये रुग्ण आणि नातेवाईकांनी काळजी कशी घ्यावी? खासदार अमोल कोल्हेंनी दिली महत्त्वाची माहिती सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडिओ, फोटोंमधून हे स्पष्टपणे दिसून येत आहे की, अंत्यसंस्कारामध्ये सामील झालेल्या लोकांनी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले असून मास्कही वापरलेले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लीम धार्मिक नेते हजरत हाजी अहमद शाह बाबा बुखारी मुफ्ती यांचे त्यांची कर्मभूमी असलेल्या मंडवी येथे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले. हे वाचा - Lockdownमध्ये काशीमिरामध्ये छमछम सुरूच; पोलिसांनी धाड टाकून 21 जणांना केली अटक, 6 मुलींची सुटका 97 वर्षीय हाजी अहमद शाह यांची प्रकृती काही दिवसांपासून खराब असल्याचे सांगण्यात येत होते. अशा परिस्थितीत रमजानच्या पवित्र महिन्यात त्यांचा मृत्यू झाला. तर 10 दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला होता. महत्त्वाचे म्हणजे हजरत हाजी अहमद शाह बाबा बुखारी मुफ्ती यांनी मुस्लीम समाजात शिक्षणामध्ये जागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
  Published by:News18 Desk
  First published: