Mann ki Baat : हिंसाचाराने प्रश्न सुटत नाहीत - पंतप्रधान मोदी

Mann ki Baat : हिंसाचाराने प्रश्न सुटत नाहीत - पंतप्रधान मोदी

'हिंसेमुळे जगात कुठे काही चांगलं घडलं असं एक तरी उदाहारण दाखवून द्या'

  • Share this:

नवी दिल्ली 26 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात'मध्ये देशवासियांशी संवाद साधला. महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान गेली 5 वर्ष मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधत आहेत. आज प्रजासत्ताक दिन असल्याने त्यांच्या संबोधनाला विशेष महत्त्व होतं. त्याचबरोबर हा भाग हा नव्या वर्षातला पहिलाच असल्याने त्यांनी यात गेल्या पाच वर्षातल्या विविध मोठ्या निर्णयांचा उल्लेख केला. त्यात नोटबंदी, जीएसटीसह अनेक निर्णय होते. कितीही मोठा निर्णय घेतला तरी जोपर्यंत त्यासाठी लोक काम करत नाहीत तोपर्यंत तो निर्णय खऱ्या अर्थाने अंमलात येवू शकत नाही असंही पंतप्रधान म्हणाले.

स्वच्छ भारत अभियान हे लोकचळवळ झालं त्यामुळे ते यशस्वी झालं. त्याचप्रमाणे सर्व योजना या जेव्हा लोक चळवळी होतील तेव्हाच त्या यशस्वी होतील असंही त्यांनी सांगितलं. मनकी बात मधून पंतप्रधान देशभरातल्या सकारात्मक गोष्टींचा उहापोह करतात. याही संबोधनात त्यांनी तामिळनाडूचा जल पुनर्भरण कार्यक्रम आणि इतर काही चळवळींचीही माहिती दिली.

काँग्रेसने PM मोदींना Amazon वरून पाठवली 170 रुपयांची खास भेट, दिला खोचक सल्ला

ओरिसा इथं होणाऱ्या राष्ट्र क्रिडा उत्सवाचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. 22 फेब्रुवारी ते 1 मे पर्यंत हा उत्सव चालणार असून त्यात देशभरातले खेळाडू सहभागी होणार आहेत.

देशातल्या परिस्थिचा थेट संदर्भ न देता पंतप्रधान म्हणाले.

CAA 'शाहीन बाग'ने आणला मोदी सरकारच्या नाकात दम, महिलांचा एल्गार

हिंसाचार हा जगातल्या कुठल्याच समस्यांचं उत्तर होऊ शकत नाही. हिंसेमुळे जगात कुठे काही चांगलं घडलं असं एक तरी उदाहारण दाखवून द्या असं सांगत त्यांनी युवकांनी हिंसाचारापासून दूर राहावं असं आवाहन केलं.

First published: January 26, 2020, 8:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading