विनोद खन्ना यांचा अभिनेता ते नेता एक प्रवास...

विनोद खन्ना यांचा अभिनेता ते नेता एक प्रवास...

हिंदी चित्रपट सृष्टीला स्टायलिस्ट आणि हॅडसम नायक अशी ओळख असलेले विनोद खन्ना राजकारणातही तेव्हढेच यशस्वी ठरले.

  • Share this:

80च्या दशकातील चित्रपट अभिनेते विनोद खन्ना यांचं दीर्घ आजारान निधन झालंय. वयाच्या 70 व्या वर्षी विनोद खन्ना यांनी अखेरचा श्वास घेतला.

हिंदी चित्रपट सृष्टीला स्टायलिस्ट आणि हॅडसम नायक अशी ओळख असलेले विनोद खन्ना राजकारणातही तेव्हढेच यशस्वी ठरले. बाॅलिवूडमधल्या 29 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर विनोद खन्ना यांनी 1997 साली राजकारणात पदार्पण केलं.

पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून ते चारवेळा लोकसभेवर निवडून गेले होते. 1999 ते 2004 या वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात त्यांनी केंद्रात मंत्रीपदही भूषवले. जुलै 2002 मध्ये त्यांना सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री बनवण्यात आलं. त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांची परराष्ट्र राज्यमंत्री या महत्वाच्या पदावर नियुक्ती झाली. वाजपेयी सरकारच्या काळात ते भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीतले एक होते.

विनोद खन्ना यांची राजकीय कारकीर्द

- 1997 साली भाजपमध्ये प्रवेश

- 1997-1999 साली पंजाबमधील गुरदासपूर खासदार

- 2004 निवडणुकीत पुन्हा लोकसभेवर

- 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव

- जुलै 2012 मध्ये केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री

- 6 महिन्यांतच केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्रिपदाची

- 2014 मध्ये लोकसभेतून विजय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2017 02:47 PM IST

ताज्या बातम्या