गावकऱ्यांना कोरोनाचा विसर; बारबालांचे नृत्य पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

गावकऱ्यांना कोरोनाचा विसर; बारबालांचे नृत्य पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

लॉकडाऊन उठवण्यात आला असता तरी कोरोना प्रभाव कमी झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी याची काळजी घेणं गरजेचं आहे

  • Share this:

फतेहपूर, 21 जून : कोरोना साथीच्या काळात अनेक ठिकाणी दुकाने आणि इतर गोष्टी सुरू झाल्या असल्या तरी कोरोना रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेणे अजूनही आवश्यक आहे.

मात्र असे असूनही बरेच लोक आपला जीव धोक्यात घालत असल्याच्या घटना समोर येत आहे. फतेहपूर जिल्ह्यात तर लग्नाची वरात आल्यानंतर गावात एक कार्यक्रम आयोजित केला होता. जिल्ह्यातील हसनगंज पोलीस स्टेशन परिसरातील भलेवा गावात आयोजित हा नृत्याचा कार्यक्रम करण्यासाठी बारबालांना बोलावण्यात आले होते.

चित्रपटातील गाण्यांवर बारबालांचे अश्लील नृत्य पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमा झाली होती आणि यावेळी सोशल डिस्टन्गिंगची ऐशीतैशी झाली.

बार गर्ल्सच्या अश्लील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी इव्हेंट ऑर्गनायझर आणि नृत्य मार्गदर्शकांना ताब्यात घेतले आहे. त्याबरोबरच एफआयआर नोंदविला आहे. हुसैनगंज पोलीस स्टेशन परिसरातील भलेवा गावात राहणारा झल्लर नावाच्या व्यक्तीचा मुलगा राजेंद्रचा विवाह होता.

मुलाची मिरवणूक परतल्यानंतर झल्लर यांनी काल रात्री आपल्या गावात एका नृत्य कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी झल्लार यांनी अधिकाऱ्यांकडून परवानगीही घेतली नाही. खेड्यात चालणार्‍या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बाहेरून बारबालांना बोलविण्यात आले होते. यावेळी बारबालांनी चित्रपटातील गाण्यांवर जोरदार नृत्य केले. ते पाहण्यासाठी गावातून मोठी गर्दी जमा झाली होती. गावातील एका जबाबदार व्यक्तीने पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली. त्यानंतर ही माहिती समोर आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कार्यक्रम बंद केला.

हे वाचा-कोरोना हॉटस्पॉट ते मॉडेल; धारावी कसा सोडवतेय कोरोनाचा विळखा?

First published: June 21, 2020, 10:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading