मराठी बातम्या /बातम्या /देश /माणूस आणि प्राण्यांमधल्या मैत्रीचं अनोख दर्शन घडवणारं ‘हे’ गाव; वाचा, अधिक माहिती एका क्लिकवर...

माणूस आणि प्राण्यांमधल्या मैत्रीचं अनोख दर्शन घडवणारं ‘हे’ गाव; वाचा, अधिक माहिती एका क्लिकवर...

फाईल फोटो

फाईल फोटो

एरवी सिंहाला समोर पाहून कोणीही घाबरेल, मात्र या गावातले लोक सिंहाच्या वावरामुळे अजिबात घाबरत नाहीत.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Junagadh, India

  जुनागड, 1 एप्रिल : माणसं प्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करायला लागली, तर प्राणीही माणसांच्या अधिवासात येणारच. आजवर यामुळे काही दुर्घटनाही घडल्या आहेत, मात्र गुजरातमधल्या एका गावात गावकरी आणि प्राणी एकत्र गुण्यागोविंदानं नांदत आहेत. विशेष म्हणजे खुलेआम फिरणारे हे प्राणी म्हणजे इतर कोणते नसून गिर अभयारण्यातले सिंह आहेत. जुनागड शहर आणि गिर राष्ट्रीय उद्यान यांच्या सीमेवरचं सासन गिर नावाचं हे गाव असून इथं अनेकदा सिंह येतात. ‘नवभारत टाइम्स’नं त्याबाबत वृत्त दिलं आहे.

  गुजरातमधलं सासन गिर हे गाव त्याच्या याच वैशिष्ट्यासाठी ओळखलं जातं. राष्ट्रीय उद्यान जवळ असल्यामुळे या गावात बरेचदा सिंह येतात. एरवी सिंहाला समोर पाहून कोणीही घाबरेल, मात्र या गावातले लोक सिंहाच्या वावरामुळे अजिबात घाबरत नाहीत. सिंहसुद्धा गावकऱ्यांना दुखापत करत नाहीत. अर्थात असं असलं तरी जंगलच्या राजापासून थोडं अंतर राखण्यातच शहाणपणा आहे, हे गावकऱ्यांनी ओळखलं आहे.

  चहा विकणाऱ्यांचा संघर्ष वेगळाच असतो; अजयने केली क्रांती, वाचा Success Story

  सासन गिर हे आशियाई सिंहांसाठीचं एक वैशिष्ट्यपूर्ण आणि संरक्षित क्षेत्र आहे. भारतात इको टुरिझमला चालना देण्यासाठी याचा महत्त्वाचा वाटा आहे. इथं असलेल्या गिर नॅशनल पार्कमध्ये अनेक आशियाई सिंह पाहायला मिळतात. तिथे जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. सकाळी आणि दुपारी मर्यादीत स्वरूपात पर्यटकांना ही परवानगी दिली जाते. या राष्ट्रीय उद्यानात 500 पेक्षा जास्त आशियाई सिंह आहेत. नामशेष होणाऱ्या प्रजातींसाठीचं हे एक विशेष संरक्षित क्षेत्र आहे.

  गिर राष्ट्रीय उद्यानाला भेट देणाऱ्यांनी सासन गिर गावाला आवर्जून भेट द्यावी. इथला मालधर समुदाय, त्यांची संस्कृती यासोबत गावकरी व सिंह कशाप्रकारे एकत्र राहतात, हे पर्यटकांना इथं पाहायला मिळू शकतं. सासन गिर इथं सिद्दी समाजाचीही काही घरं आहेत. हा भारतातील एक वैशिष्ट्यपूर्ण समाज आहे. दक्षिण पूर्व आफ्रिकेतील बंटू जमातीच्या लोकांचे हे वंशज आहेत. सासन गिर गावात अनेक पर्यटकांची सतत ये-जा सुरू असते. हे गाव गिर राष्ट्रीय उद्यानाच्या अगदी शेजारी असल्यानं गावात बरेचदा सिंहांचं दर्शन होतं. गावकरीही न घाबरता आता सिंहांच्या वास्तव्याला सरावले आहेत.

  गिर राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ योग्य मानला जातो. या काळात इथं जंगल सफारींचं आयोजन केलं जातं. अभ्यासक, फोटोग्राफर्स यांचीही इथे नेहमी वर्दळ असते.

  First published:
  top videos

   Tags: Gujrat, Other animal, Wild animal