पहिलं राफेल घ्यायला राजनाथ फ्रान्समध्ये; शस्त्रपूजन करून भारताकडे उड्डाण

पहिलं राफेल घ्यायला राजनाथ फ्रान्समध्ये; शस्त्रपूजन करून भारताकडे उड्डाण

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पॅरिसमध्ये आज अनोखं शस्त्रपूजन होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह Defence Minister Rajnath Singh यांच्या हस्ते आज अनोखं शस्त्रपूजन होणार आहे. राजनाथ सिंह फ्रान्समध्ये आहेत. तीन दिवसीय पॅरिस Paris दौऱ्यावर गेलेले संरक्षणमंत्री विजयादशमी Vijaya Dashmi निमित्त ते नव्या करारानुसार मिळणारं पहिलं राफेल लढाऊ विमान ताब्यात घेणार आहेत. पॅरिसमध्ये ते राफेल विमानांचं पूजन करणार आणि मग भारताकडे ते विमान उड्डाण भरणार.

भारतीय वायुदल दिनानिमित्त भारतीय वायुदलाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या पहिल्या 36 राफेल विमानांचं पूजन राजनाथ सिंहांच्या हस्ते होणार आहे.

राजनाथ सिंह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमान्युएल मॅक्रोन यांची भेट घेणार आहेत. फ्रान्सचं बंदर बोरेडॉक्समध्ये राजनाथ सिंह शस्त्रपूजन करतील. पुढच्या वर्षीच्या मे पर्यंत ही चार विमानं भारतीय वायुदलाच्या ताफ्यात दाखल होतील.

भारतात दसऱ्याला शस्त्रपूजन करण्याची परंपरा आहे. यानुसार ते ही पूजा करतील. राफेल विमानं तयार करणाऱ्या दसॉ एव्हिएशन कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसमवेत राजनाथ सिंह शस्त्रपूजन करतील.

वाचा - वडिलांनी सोडली साथ, मोठ्या भावाचं निधन, KBC स्पर्धकाची कहाणी ऐकून बिग बी भावुक

दसऱ्याचा (Dussehra) मुहूर्त साधून ते ही पूजा करतील. भारत आणि फ्रान्सदरम्यान झालेल्या करारानुसार चार विमानांचा पहिला ताफा भारताला मिळणार आहे. पुढच्या वर्षीपर्यंत ही विमानं भारतीय वायुदलात दाखल होतील. एकून 36 राफेल जेट विमानं या कराराअंतर्गत भारताला मिळणार आहेत.

--------------------------------------------------------

युतीला मेगाभरती पडली भारी, बंडोबांनी दंड थोपडले दारोदारी, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2019 09:38 AM IST

ताज्या बातम्या