News18 Lokmat

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची विजय रुपानी २६ डिसेंबरला घेणार शपथ

या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, १८ भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि इतर महत्त्वाचे नेते हजर असणार आहेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 24, 2017 01:16 PM IST

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची विजय रुपानी २६ डिसेंबरला घेणार शपथ

24 डिसेंबर : गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून विजय रुपानी हे दुसऱ्यांदा येत्या मंगळवारी म्हणजे २६ डिसेंबरला सकाळी ११ वाजता शपथ घेणार आहेत. गांधीनगरच्या सचिवालयाच्या मैदानात हा शपथविधी होणार आहे. रुपानी यांच्यासोबत नितीन पटेल हेही शपथ घेणार आहेत. ते गेल्या सरकारप्रमाणेच याही सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणार आहेत.

यापूर्वी हा सोहळा २५ डिसेंबरला भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवशी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. राज्याचे मुख्य सचिव जे एन सिंग यांनी यापूर्वी शपथविधी कार्यक्रमासाठी अहमदाबादमधील सरदार पाटील मैदान तसंच साबरमती रिव्हरफ्रंट या दोन ठिकाणांची पाहणी केली होती. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, १८ भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि इतर महत्त्वाचे नेते हजर असणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 24, 2017 01:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...