News18 Lokmat

विजय रुपानी पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री तर नितीन पटेल उपमुख्यमंत्री !

भाजपच्या बैठकीत दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 22, 2017 06:18 PM IST

विजय रुपानी पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री तर नितीन पटेल उपमुख्यमंत्री !

22 डिसेंबर : गुजरातमध्ये पुन्हा एकदा विजय रुपानी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडलीये. तर नितीन पटेल पुन्हा उपमुख्यमंत्री होणार आहे. भाजपच्या बैठकीत दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय.

भाजपच्या कोअऱ कमिटीच्या बैठकीत पर्यवेक्षक अरूण जेटली आणि सरोज पांडेय यांनी विजय रुपानी यांच्या नावाची घोषणा केली. गुजरातमधील आमदारांच्या एकमतांनी विजय रुपानी यांच्या नावाची निवड करण्यात आलीये अशी माहिती अरुण जेटली यांनी दिली.

गुजरात निवडणुकीत भाजपने 182 पैकी 99 जागांवर विजय मिळवलाय. तर काँग्रेसने 77 जागा जिंकत दुसरे स्थान पटकावले आहे. तर इतर पक्षांन सहा जागा जिंकल्यात.

विशेष म्हणजे, गुजरात निवडणुकीत भाजप काठावर पास झालीये. त्यामुळे भाजप मुख्यमंत्रिपदासाठी नव्या चेहऱ्याला संधी देणार अशी चर्चा होती. मागील निवडणुकीत भाजपला 115 जागा मिळाल्या होत्या. यावेळी घसरण होऊन 99 जागांवर भाजपला समाधान मानावे लागले. त्यामुळे जर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बदलला तर चुकीचा निरोप जाईल म्हणून पुन्हा एकदा विजय रुपानींची निवड करण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 22, 2017 06:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...