गुजरातमध्ये सहाव्यांदा भाजप सरकार; रुपानी मुख्यमंत्रिपदी दुसऱ्यांदा विराजमान

गांधीनगरच्या सचिवालयाच्या मैदानात हा शपथविधी पार पडला आहे. रुपानी यांच्यासोबत नितीन पटेल यांनी ही शपथ घेतली आहे. ते गेल्या सरकारप्रमाणेच याही सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणार आहेत.

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 26, 2017 12:21 PM IST

गुजरातमध्ये सहाव्यांदा भाजप सरकार; रुपानी मुख्यमंत्रिपदी दुसऱ्यांदा विराजमान

26 डिसेंबर : गुजरातमध्ये सहाव्यांदा भाजप सरकार स्थापन झालं आहे.  आज सकाळी 11 वाजता विजय रूपानी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

गांधीनगरच्या सचिवालयाच्या मैदानात हा शपथविधी पार पडला आहे. रुपानी यांच्यासोबत नितीन पटेल यांनी ही शपथ घेतली आहे. ते गेल्या सरकारप्रमाणेच याही सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणार आहेत. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, १८ भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि इतर महत्त्वाचे नेते हजर आहेत. शपथविधीच्या आधी रुपानींनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. रुपानींच्या ऐवजी दुसऱ्या कुणाला संधी द्यावी का, यावर विचार सुरू होता. पण शेवटी मोदी आणि शहांनी रुपानींच्या नावावरच शिक्कामोर्तब केलं होतं.

गुजरातमध्ये कशाबशा 100 जागांसह भाजपला आपलं सरकार टिकवण्यात यश आलं आहे. पण बेरोजगारी, शिक्षण ,पाटीदार आंदोलन अशा अनेक समस्या या सरकारसमोर आहेत. त्यामुळे या सगळ्या  समस्यांन हे सरकार कसं तोंड देतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

कोण आहेत  विजय रुपानी? 

- जन्म - 2 ऑगस्ट 1956

- जन्म ठिकाण - रंगून, बर्मा

- सौराष्ट्र विद्यापीठातून बी. ए.

- सौराष्ट्र विद्यापीठातूनच एलएलबीची पदवी

- 1971 साली जनसंघात प्रवेश

- आणीबाणीदरम्यान 11 महिने तुरुंगात

- 1978-81 - संघाचे प्रचारक

- 1987 - राजकोट महानगरपालिकेत नगरसेवक

- 1988-96 - राजकोट मनपा स्थायी समिती अध्यक्ष

- 1996-97 - राजकोटचे महापौर

- 1998 - गुजरात भाजपचे सरचिटणीस

- 2006 - गुजरात पर्यटनाचे अध्यक्ष

- 2006-12 - राज्यसभा खासदार

- 19 ऑक्टोबर 2014 - विधानसभेचे आमदार

19 फेब्रुवारी 2016 - गुजरात भाजपचे अध्यक्ष

- 7 ऑगस्ट 2016 - मुख्यमंत्रिपदाची शपथ

- 26 डिसेंबर 2017 - मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2017 12:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close