विजय माल्या म्हणाला, 'जेलमध्ये जाऊनही मी कर्ज फेडेन'

पुन्हा सांगू इच्छितो की मी बँकांचं संपूर्ण कर्ज चुकवेन - विजय माल्या

News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2019 11:20 AM IST

विजय माल्या म्हणाला, 'जेलमध्ये जाऊनही मी कर्ज फेडेन'

नवी दिल्ली, 17 एप्रिल : देशातील बँकांना जवळपास 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय माल्यानं जेट एअरवेजकडून मदत मिळत नसल्यानं दुःख व्यक्त केलं आहे.

'जेलमध्ये राहूनही कर्ज फेडण्यास तयार'

माल्यानं मंगळवारी (16 एप्रिल) ट्विट करत म्हटलं की,'पुन्हा सांगू इच्छितो की मी बँकांचं संपूर्ण कर्ज चुकवेन. मला भारतात प्रत्यार्पण करण्यास भीती वाटत आहे,असं मीडिया सांगत आहे. पण मी लंडन किंवा भारतीय जेलमध्ये कुठेही असेन, कोणत्याही परिस्थितीत कर्जाची परतफेड करेन.

'मी किंगफिशरमध्ये प्रचंड प्रमाणात गुंतवणूक केली आहे. यामुळेच किंगफिशर भारतातील टॉपची आणि सर्वाधिक पुरस्कार पटकावणारी एअरलाईन्स ठरली होती. मी 100 टक्के कर्जाची परतफेड करण्यासंदर्भातील प्रस्ताव दिला आहे. पण या मोबादल्यात मला आरोपी घोषित करण्यात आलं', असंही माल्यानं म्हटलं आहे.माल्याचा सरकारवर आरोप

भलेही जेट एअरवेज आणि किंगफिशर एकमेकांच्या प्रतिस्पर्धक कंपनी होत्या, पण एका मोठ्या खासगी एअरलाईन्सला आर्थिक संकटामुळे बुडताना पाहून दुःख होत आहे. दुसरीकडे एअर इंडियाला वाचवण्यासाठी सरकारनं 35 हजार कोटी रुपयांच्या सार्वजनिक निधीचा वापर केला, असंही माल्यानं ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

यापूर्वीही माल्यानं ट्विट करत म्हटलं होतं की, 'सरकारी बँकांनी माझ्याकडून रोखरक्कम घेतली पाहिजी, जेणेकरून ते जेट एअरवेजची मदत करू शकतील.'

वाचा अन्य बातम्या

VIDEO: प्रेमीयुगुलाला अमानुष मारहाण; व्हिडिओ व्हायरल

VIDEO : चिक्की घोटाळ्याच्या आरोपानंतर पंकजांचा पलटवार, धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

SPECIAL REPORT: आश्वासनाचा पुणे पॅटर्न, हेल्मेटचं चिन्ह मिळताच सक्ती रद्द करण्याचं आश्वासन

VIDEO : राष्ट्रवादीच्या तळावर सर्जिकल स्ट्राईक, प्रीतम यांचं धनंजय मुंडेंवर टीकास्त्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 11:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...