लंडन, 26 मार्च : भारतीय बँकांना 9 हजार कोटींचा चुना लावून परदेशी पळालेल्या विजय माल्ल्यानं आता जेट एअरवेजला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जेट एअरवेजला वाचवण्यासाठी आता हवे तर माझे पैसे घ्या, पण जेट एअरवेजला वाचवा असं आवाहन विजय माल्ल्यानं केलं आहे. पीएयू बँकेनं उचललेल्या पावलाबद्दल देखील मी समाधानी असल्याचं विजय माल्ल्यान म्हटलं आहे. शिवाय, युपीए आणि एनडीए सरकारमध्ये फरक काय? असा सवाल देखील यावेळी विजय माल्ल्यानं केला आहे. ट्विटवरून विजय माल्ल्यानं त्याचं म्हणणं मांडलं आहे.
Happy to see that PSU Banks have bailed out Jet Airways saving jobs, connectivity and enterprise. Only wish the same was done for Kingfisher.
BJP spokesman eloquently read out my letters to PM Manmohan Singh and alleged that PSU Banks under the UPA Government had wrongly supported Kingfisher Airlines. Media decimated me for writing to the current PM. I wonder what has changed now under the NDA Government.
I invested over 4000 crores into Kingfisher Airlines to save the Company and its employees. Not recognised and instead slammed in every possible way. The same PSU Banks let India’s finest airline with the best employees and connectivity fail ruthlessly. Double standards under NDA
देशातील दुसऱ्या क्रमांकाची विमान कंपनी असलेली ‘जेट एअरवेज’ कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. दरम्यान, जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. शिवाय, त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांनी देखील बोर्ड सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. थकलेल्या पगाराच्या निषेधार्थ जेटच्या वैमानिकांनी 1 एप्रिलपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, सरकारनं देखील या साऱ्या प्रकरणामध्ये लक्ष घातलं असून कंपनीला कर्जबाजारी न होऊ देण्यासाठी बँकांना देखील आदेश देण्यात आले आहेत. सध्या कंपनीवर 1 अब्ज रूपयांपेक्षा देखील जास्त कर्ज आहे. तर, कंपनीच्या ताफ्यातील केवळ 41 विमानांची उड्डाणं सध्या सुरू आहेत. इतर कंपन्यांशी स्पर्धा, घसरता रूपया आणि इंधानाचे वाढते दर यामुळे कंपनीला आता अनेक उड्डाणे रद्द करावी लागत आहेत.
SPECIAL REPORT: बोलण्याच्या नादात पातळी सोडताहे 'वाचाळवीर'