News18 Lokmat

मुलगा आणि बायकोच्या जीवावर जगतोय - माल्ल्या

विजय माल्ल्यानं अनेकांकडून पैसे उधार घेतले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 4, 2019 09:31 AM IST

मुलगा आणि बायकोच्या जीवावर जगतोय - माल्ल्या

लंडन, 04 एप्रिल : 'वेळ पडल्यास माझे पैसे घ्या. पण, जेट एअरवेजला वाचवा' अशी बतावणी करणाऱ्या विजय माल्ल्यानं पुन्हा एकदा आपले रंग दाखवायला सुरूवात केली आहे. माझ्याकडे आता काहीही पैसे नसून मी मुलगा आणि बायकोच्या मदतीनं जीवन जगत असल्याचं माल्ल्यानं म्हटलं आहे. भारतीय बँकांना तब्बल 9 हजार कोटींचा चुना लावून माल्ल्या लंडनमध्ये फरार झाला आहे. देशातील 13 बँकांनी माल्ल्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. बँकांचे पैसे परत करण्यासाठी विजय माल्ल्यानं आपली 2956 कोटी रूपयांची संपत्ती कर्नाटक उच्च न्यायालयासमोर सादर केली.

विजय माल्ल्या सध्या लंडनमध्ये वास्तव्याला असून त्याला लंडनमधील न्यायालयानं देखील मोठा धक्का दिला आहे. दरम्यान, त्याच्या प्रर्त्यापणासाठी आता भारत सरकार देखील प्रयत्न करत असून त्याबाबत लंडनच्या न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.


उसने पैसे घेतोय माल्ल्या

विजय माल्ल्यानं आतापर्यंत अनेकांकडून पैसे उसने म्हणून देखील घेतले आहेत. ब्रिटन सरकारचा 2.40 कोटी रूपयांच्या टॅक्ससह वकील मैकफलेंस यांचे पैसे देखील विजय माल्ल्यानं अद्याप दिलेले नाहीत. भारतीय बँकांनी कायदेशीर कारवाईसाठी खर्च केलेले 1.57 कोटी रूपये देखील माल्ल्यानं अद्याप दिलेले नाहीत.

Loading...

माल्ल्याची पत्नी पिंकी ललवानी वर्षाला 1.35 कोटी रूपये कमवते. त्यानं आपल्या पर्सनल असिस्टंटकडून 75.1 लाख आणि ओळखीच्या व्यक्तिकडून 1.35 कोटी रूपये उधार घेतले आहेत.

बुधवारी भारतीय बँकांनी लंडनस्थित आयसीआयसी बँक खात्यावर ताबा देण्याची विनंती न्यायालयाला केली. विजय माल्ल्या स्वत:ला लंडनचा नागरिक असल्याचं सांगतो. 1992 पासून आपण लंडनचा नागरिक असल्याचं माल्ल्यानं ट्विटरवरून यापूर्वी सांगितलं आहे. विजय माल्ल्याला भारतात केव्हा आणणार याकडे आता सर्वाचं लक्ष आहे.


VIDEO: दरवाजा अडवणाऱ्यांच्या विरोधात महिलांचा रेल रोको, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 09:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...