मल्ल्याला दणका, ब्रिटनमधली संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश

मल्ल्याला दणका, ब्रिटनमधली संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश

फरार मद्यसम्राट विजय मल्ल्याला ब्रिटनच्या हायकोर्टानं जोरदार दणका दिला आहे. मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत.

  • Share this:

लंडन,ता.5 जुलै: फरार मद्यसम्राट विजय मल्ल्याला ब्रिटनच्या हायकोर्टानं जोरदार दणका दिला आहे. लंडनमध्ये विजय मल्ल्याच्या आलिशान निवासस्थानी प्रवेश करण्याचे आणि तापासणी करण्याचे आणि गरज पडल्यास संपत्ती जप्त करण्याचे आदेश ब्रिटीश अधिकाऱ्यांना देण्यात आलेत. आहेत. भारतातल्या 13 बँकांनी ब्रिटनच्या कोर्टात मल्ल्याविरूद्ध खटला दाखल केला होता. आता बँकांच्या बाजूने निर्णय आल्याने मल्ल्यांविरूद्धचा फास आणखी आवळला आहे.

लंडनमधल्या लेडीवॉक आणि ब्रेंबल लॉज या संपत्तीवर यामुळे टाच येण्याची शक्यता आहे. विजय मल्ल्या सध्या याच आलिशान व्हिलामध्ये वास्तव्यास आहे. भारतीय बँकांचे तब्बल 9 हजार कोटी बुडवल्याचा विजय मल्ल्यावर आरोप आहे.

निवासस्थानी प्रवेश करण्यास मनाई केल्यास बळाचा वापर करण्याचे अधिकारही या अधिकाऱ्यांना न्यायालयाने दिले आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये प्रत्यार्पण करार असल्याने मल्ल्याला भारतात परत आणण्यासाठी या निर्णयाचा फायदा होणार आहे. अलिशान जीवनशैली, उधळपट्टी आणि आर्थिक बेबंदशाहीमुळं मल्ल्याचा व्यवसाय डब्यात गेला. पुढे काय होणार याची चाहुल त्याला लागताच त्याने ब्रिटनला पलायन केले.

हेही वाचा...

प्रियांका चतुर्वेदींना ट्विटरवर धमकी देणारा पोलिसांच्या जाळ्यात

कुमारस्वामींच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी; पेट्रोल मात्र महागले

कर्करोगग्रस्त सोनालीला भेटायला पोहोचला 'हा' सुपरस्टार

'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेत प्रेम राधापर्यंत पोहचू शकेल का?

सुबोध भावेच्या 'पुष्पक विमान'चा टीझर तुम्ही पाहिलात का?

 

First published: July 5, 2018, 10:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading