विजय माल्ल्याची तिहार तुरूंगाची वारी निश्चित; भारत – इंग्लंडच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा

विजय माल्ल्याची तिहार तुरूंगाची वारी निश्चित; भारत – इंग्लंडच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा

विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 मे : भारतीय बँकांना 9 हजार कोटींचा चुना लावून विजय माल्ल्या परदेशी पसार झाला. लंडनच्या कोर्टानं विजय माल्ल्याची प्रत्यार्पण विरोधी याचिका फेटाळून लावली आहे. त्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणाच्या हालचालींना वेग आला असून त्याची तिहार जेलमधील वारी आता निश्चित मानली जात आहे. बुधवारी तिहार जेल प्रशासन आणि इंग्लंडच्या अधिकाऱ्यांमध्ये विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भात चर्चा देखील झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्याशिवाय नीरव मोदी आणि 2000मध्ये मॅच फिग्सिंग प्रकरणातील मुख्य आरोपी संजीव चावलाला देखील भारतात आणलं जाऊ शकतं. त्याबाबत आता हालचलींना वेग आला आहे.

मार्च 2016मध्ये विजय माल्ल्या लंडनला पसार झाला. 2017मध्ये स्कॉटलंड पोलिसांनी अटक केल्यानंतर विजय माल्ल्याला जामिनावर सोडण्यात आलं. पण, 10 डिसेंबर 2018मध्ये लंडनच्या कोर्टानं विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीवर होऊ शकतो दहशतवादी हल्ला

काय आहे मल्ल्या प्रकरण?

देशभरातल्या बँकांचं जवळपास 9 हजार कोटींचं कर्ज त्याने बुडवलं आहे. विजय मल्ल्याचं सध्या लंडनमध्ये वास्तव्य आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी वेस्टमिंस्टर कोर्टात गेली काही दिवस सुनावणी सुरू होती. त्यानंतर त्यांच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला.

भारतात आल्यावर कायद्याच्या कचाट्यातून आपली सुटका होणार नाही याची विजय मल्ल्याला भीती वाटते. त्याच्या प्रकरणावर येवढं राजकारण झाल्यामुळे माध्यमांचा दबावही त्याच्यावर आहे. राजकारण, कायद्याची लांबलचक चालणारी प्रक्रिया यामुळे भारतात येण्याचं विजय मल्ल्या टाळत आहे.

सक्त वसुली संचालयाने त्याला फरार आरोपी असं म्हटलं होतं. 'फरारी आरोपी' या शब्दामुळे माझ्या प्रतिमेला धक्का लागला आहे. त्यामुळं 'फरारी आरोपी' हा शब्द काढून टाकावा असं मल्ल्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून मागणी केली होती.

काही महिन्यांपूर्वी विजय मल्ल्याने बँकांकडे नवा प्रस्ताव पाठवला होता. त्यात त्याने मुद्दलाचे पूर्ण पैसे देतो, व्याज नाही असं आश्वासन दिलं होतं. पण बँका त्याचा हा प्रस्ताव मान्य करण्याची शक्यता नाही.

Rahul Gandhi EXCLUSIVE, 'मोदींबाबत माझ्या मनात राग नाही'

First published: May 4, 2019, 4:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading