मराठी बातम्या /बातम्या /देश /

मध्य प्रदेशमध्ये मुलाला वाचवण्यासाठी गेलेले गावकरी विहिरीत कोसळले, 20 जणांना बाहेर काढले

मध्य प्रदेशमध्ये मुलाला वाचवण्यासाठी गेलेले गावकरी विहिरीत कोसळले, 20 जणांना बाहेर काढले

पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती मिळताच गावात घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती मिळताच गावात घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती मिळताच गावात घटनास्थळी धाव घेतली.

  • Published by:  sachin Salve
विदिशा, 15 जुलै : मध्य प्रदेशमधील विदिशा (Vidisha) जिल्ह्यातील गंजबासौदामध्ये 30 ते 40 लोक विहिरीमध्ये पडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून 20 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. घटनास्थळी NDRF, पोलीस आणि एसडीआरएफची टीम दाखल झाली असून मदतकार्य सुरू आहे. गंजबासौदामधील लालपठार गावात ही घटना घडली आहे. विहिरीमध्ये एक मुलगा पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी गावातील इतर लोकांना धाव घेतली होती. पण, मुलाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात गावातील काही तरुण विहिरीत पडले. विहिरीजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. विहिरीच्या कठड्याभोवती लोक गोळा झाली होती. त्याचवेळी विहिरीच्या आजूबाजूची जमीन घसरली आणि अनेक लोकं विहिरी पडली. रात्रीचा अंधार असल्यामुळे नेमकं काय घडलं याची कल्पना कुणालाच आली नाही. लोकांनी एकच आरडाओरडा केल्यामुळे इतर गावातील लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा घटना समोर आली. पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती मिळताच गावात घटनास्थळी धाव घेतली.  NDRF, पोलीस आणि एसडीआरएफची टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झाली आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत 20 जणांना विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घटनेबद्दल माहिती घेतली असून घटनास्थळावर मदतकार्य सुरू आहे. NDRF ची टीम पोहोचली असून बचावकार्य सुरू आहे.
First published:

पुढील बातम्या