आंध्र विधानसभा निकाल- CM चंद्राबाबूंची दाणादाण, YSR रेड्डींची जोरदार मुंसडी

आंध्र विधानसभा निकाल- CM चंद्राबाबूंची दाणादाण, YSR रेड्डींची जोरदार मुंसडी

देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता असताना आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेस पक्षाने जोरदार मुंसडी मारली आहे.

  • Share this:

हैदराबाद, 23 मे: देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता असताना आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेस पक्षाने जोरदार मुंसडी मारली आहे. जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेसने विधानसभेच्या 168 पैकी 124 जागांवर आघाडी घेतली आहे. तर चंद्राबाबू नायडूंच्या तेलगू देशम पक्षाला केवळ 25 जागांवर आघाडी आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात सत्ताधारी टीडीपीला मोठा धक्का बसला आहे. केवळ विधानसभेतच नाही तर लोकसभेत सुद्धा मुख्यमंत्री नायडूंना धक्का बसला आहे.


लोकसभेचे चित्र

आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस आघाडीवर आहे. त्यांनी चंद्राबाबू नायडूंच्या तेलगु देसम पक्षावर चांगलीच आघाडी घेतली आहे. आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणूकही झाली. त्यामुळे या राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगु देसम आणि जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस पक्ष यांच्यात जोरदार लढत झाली.

आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण 25 जागा आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडूंच्या तेलगु देसम पक्षाने 15 जागा मिळवल्या तर जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाला 8 जागा मिळाल्या. भाजप इथे 2 जागा मिळवू शकलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 11:46 AM IST

ताज्या बातम्या