VIDEO : नरेंद्र मोदींना एवढं यश मिळवून देण्यामागे होता हा व्हिडिओ

VIDEO : नरेंद्र मोदींना एवढं यश मिळवून देण्यामागे होता हा व्हिडिओ

2014 प्रमाणे 2019मध्ये देखील भाजपनं सोशल मीडियावरून योग्य रितीनं प्रचार केला.

  • Share this:

मुंबई, 24 मे : लोकसभा निवडणुकीत भाजपला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा यश मिळालं. भाजपला मिळालेलं हे यश 2014पेक्षा देखील मोठं आहे. 2014मध्ये देखील भाजपनं ‘हम मोदीजी को लाने वाले है, अच्छे दिन आने वाले है’ अशी जाहिरात केली होती. तत्कालीन सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करताना भाजपनं बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाईसारख्या प्रश्नांना हात घातला होता. त्यावेळी देखील भाजपनं प्रचारासाठी सोशल मीडियाचा योग्य पद्धतीनं वापर केला होता. शिवाय, विरोधकांनी चायवाला अशी टीका केल्यानंतर त्याचा प्रचारामध्ये पुरेपूर वापर केला होता. 2014मध्ये व्हिडीओच्या माध्यमातून भाजपनं सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं होतं. त्यामुळे भाजपला यश देखील मिळालं होतं.
2019मध्ये देखील विरोधकांना उत्तर

2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोशल मीडियाचं अस्त्र भाजपवर बुमरँग होईल अशी चर्चा होती. पण, यावेळी देखील भाजपनं सोशल मीडियाचा योग्य वेळी वापर करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.


राफेल कराराचा हवाला देत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'चौकीदार चोर है' अशी घोषणा दिली. त्यानंतर भाजपनं 'मै भी चौंकीदार' सारखं कॅम्पेन सुरू केलं होतं. विरोधकांना त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून उत्तर दिलं. शिवाय, ट्विटरवर देखील 'मै भी चौकीदार' कॅम्पेन सुरू केलं. या सर्व गोष्टींमुळे 2019मध्ये देखील भाजपला सत्तेचा सोपान चढणं शक्य झालं.

2019 लोकसभा निवडणुकीत भाजपनं बहुमताचा आकडा पार केला. तर, NDAचं संख्याबळ हे 350पर्यंत गेलं. यावर्षी भाजपचा प्रचार हा राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर अवलंबून होता. आपल्या प्रत्येक प्रचारसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याच मुद्यांवर भर दिला.


VIDEO: धर्मात तेढ निर्माण करणारे यशस्वी झाले- सुशीलकुमार शिंदे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 04:07 PM IST

ताज्या बातम्या