नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी: बॉलिवूड अभिनेते आणि लोकसभेचे माजी सदस्य शत्रुघ्न सिन्हा पुन्हा एकदा सोशल मीडियावर टीकेचे धनी झाली आहेत. युझर्सनी शत्रुघ्न सिन्हा यांना तुफान ट्रोल केलं आहे. त्याचं कारणही तसंच आहे म्हणा. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असतानाच शत्रुघ्न सिन्हा मात्र सर्वांची नजर चुकवून थेट पाकिस्तानात पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ लाहोरचा असल्याचा सांगण्यात येत आहे. लाहोर इथे एका लग्नसमारंभात शत्रुघ्न सिन्हा उपस्थित होते.
पाकिस्तानातील परवेझ मुगल नावाच्या फोटोग्राफरनं लग्नाचे काही फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शत्रुघ्न सिन्हा या लग्न समारंभात उपस्थित असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर युझर्सनी चर्चा सुरू केली आहे.
हेही वाचा-2800 फुट उंचावरून या मुलीने केलं असं काही, VIDEO पाहून हृदयाचे ठोके नक्की वाढतील
लाहोर इथल्या लग्न समारंभात बॉलिवूड अभिनेत्री रीमा खान आणि राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा उपस्थित असल्याचं त्याने कॅप्शन देऊन हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आहे. मात्र शत्रुघ्न सिन्हा यांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगणं पसंत केलं असलं तरी युझर्स मात्र त्यांना या व्हिडिओबाबत सोशल मीडियावर विचारत आहेत. या लग्न समारंभाच्या निमित्तानं शत्रुघ्न सिन्हा गुपचूप सगळ्यांची नजर चुकवून पाकिस्तानला गेले असल्याची चर्चा मात्र सोशल मीडियावर तुफान रंगली आहे.
हेही वाचा-'ती' वाजवत राहिली वायोलिन, अन् डॉक्टरांनी केली मेंदूची सर्जरी, पाहा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pakistan, Shatrughan sinha