Home /News /national /

लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याने वडिलांसमोरच केलं आत्मसमर्पण, सैन्य दलाने कसं केलं प्रवृत्त? पाहा VIDEO

लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याने वडिलांसमोरच केलं आत्मसमर्पण, सैन्य दलाने कसं केलं प्रवृत्त? पाहा VIDEO

दहशतवादी आणि भारतीय सैन्यामधील संवादाचा VIDEO समोर आला आहे

    श्रीनगर, 16 ऑक्टोबर : काश्मीर (Kashmir) मध्ये सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमधील संघर्षाच्या बातम्या वारंवार येत असतात. मात्र आता परिस्थिती बदलत आहे. यंदा खोऱ्यातून असं चित्र समोर आलं आहे, जे एनकाऊंटरच्या बातम्यांहून एकदम वेगळं आहे. काश्मिरमधील बडदावमध्ये भारतीय सैन्याने लश्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याची समजूत काढून त्याला आत्मसमर्पण करायला भाग पाडलं. त्यानंतर दहशतवाद्याने सैन्याचे आभार मानले. यावेळी दहशतवाद्याने त्याच्या वडिलांसमोर भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले. शुक्रवारी बडगाव जिल्ह्यातील छदूडा भागात सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये वाद सुरू झाला. मात्र ऑपरेशनदरम्यान सैन्याने लश्कर-ए-तैय्यबाच्या जहांगीर अहमद नावाच्या दहशतवाद्याची समजूत काढली व त्याला आत्मसमर्पण करायवयास सांगितले. कोणत्याही ऑपरेशनपूर्वी सैन्याचे जवान स्थानिक दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी सांगतात. संघर्षादरम्यान दहशतवादी जहांगीरच्या आत्मसमर्पणाचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये सैन्याचे जवान म्हणतात की, कोणीही फायर करणार नाही. हेही वाचा-पंतप्रधान मोदींचा CM उद्धव ठाकरेंना फोन, पूराच्या संकटात दिलं मदतीचं आश्वासन इकडे या..सैन्याचे जवान त्याची समजूत घालतात. तुला काही होणार नाही, असं म्हणत त्याला विश्वासात घेतात. यानंतर सैन्याचे जवान त्या दहशतवाद्याला ताब्यात घेतात. दहशतवाद्याजवळ AK47 सापडली आहे. यानंतर जहांगीर अहमदच्या कुटुंबीयाने त्याची भेट घेतली. आपला मुलगा आत्मसमर्पण करीत असल्याचे पाहून कुटुंबीयांना आनंद झाला. त्यांनीही सैन्याचे आभार मानले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Terrorist

    पुढील बातम्या