VIDEO : 'अम्फान'नंतर 2 गटांमध्ये तुफान हाणामारी, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून गोळीबार

VIDEO : 'अम्फान'नंतर 2 गटांमध्ये तुफान हाणामारी, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून गोळीबार

अम्फान वादळानंतर झोपडपट्टी भागात दोन गटांमध्ये वीजेवरून दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद पाहता पाहता विकोपाला गेला

  • Share this:

कोलकाता, 27 मे : अम्फान चक्रीवादळाचा पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांना मोठा फटका बसला आहे. या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतानाच तणावाचा वातावरण निर्माण झालं. संकट काळात मदतीचा हात देण्याऐवजी छोट्या कारणावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. ही घटना मेटिआबरूज परिसरातील झोपडपट्टीमध्ये घडली. दोन्ही गटांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं पोलिसांना दगडफेक आणि हवेत गोळीबारही करण्याची वेळ आली.

मिळालेल्या माहितीनुसार अम्फान वादळानंतर दोन झोपडपट्टी भागात वीजेवरून दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद पाहता पाहता विकोपाला गेला आणि एकमेकांच्या जीवावर उठल्यानं परिसरात तणावाचा वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी दगडफेक आणि गोळीबार करावा लागला.

हे वाचा-कोरोनाला हरवण्यासाठी भारत वापरणार नवा फॉर्म्युला, लस नाही तर 'हा' आहे प्लॅन

अम्फान चक्रीवादळामुळे 72 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर 1 लाख कोटीहून अधिक नुकसान झालं असल्याचं प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं होतं. आधीच कोरोनाचं संकट असताना त्यात अम्फाननं थैमान घातलं होता. एकमेकांना मदत कऱण्याऐवजी दोन गट आपआपसात भिडले. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापरही करावा लागला. सध्या या परिसरातील स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळाली आहे.

हे वाचा-राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या नारायण राणेंना शिवसेनेनं फटकारलं

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 27, 2020, 9:41 AM IST

ताज्या बातम्या