नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी : लग्न म्हटलं की हौस आणि मजा-मस्ती, नाते यांचा एकत्रित मिलाफ. हा दिवस अधिकाधिक स्पेशल करण्यासाठी कुटुंबाकडून मोठे प्रयत्न केले जातात. लग्नाचा सभागृह, जेवण, फोटो या सर्व बाबी एकदम परफेक्ट असावं यासाठी दोन्ही बाजूच्या कुटुंबीयांकडून पुरेपुर प्रयत्न केले जातात. केरळमधील एका नवरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लग्नाच्या दिवशी नवरीला सरप्राईज देण्यासाठी नवरा नवनव्या क्लृप्त्या शोधत असतो, हे आपल्याला माहित आहेच. मात्र या व्हिडिओमध्ये नवरीने नवऱ्याला जबरदस्त सरप्राईज दिलं आहे.
Be prepared folks. This is Year 2020. Brides will no more be shy or coy on their big days. See how a bride makes her entrance for her wedding in Cannor, Kerala. pic.twitter.com/y9ZZjnYEpu
— Karan Kapoor (@karannkapoor18) January 28, 2020
लाल रंगाची साडी नेसलेली, केसांवर गजरा माळलेली अत्यंत देखणी अशी नवरी आपल्या लग्नात अशी नाचली की सर्वजण बघतच राहिले. या नवरीचे नाव अंजली असून तिने लग्नाच्या एन्ट्रीला मलाइयीरू या गाण्यावर नृत्य केलं आहे. तिला आपल्या होणाऱ्या पतीला डान्सच्या माध्यमातून सरप्राईज द्यायचं होतं. आतापर्यंत 78,000 जणांनी तिचा व्हिडिओ पाहिला आहे. अनेकांनी तिच्या या नृत्याचं कौतुक केलं आहे. अनेकांनी मात्र हा प्रकार जुना असल्याचे मत व्यक्त केलं आहे.
अन्य बातम्या
पतीने सर्च केला PORN व्हिडिओ, पहिलाच दिसला पत्नीचा फोटो आणि...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance, Marriage, Viral video.