उधळलेल्या गाईसोबत फरफटत गेला मुलगा, पाहा दुर्घटनेचा थरारक VIDEO

उधळलेल्या गाईसोबत फरफटत गेला मुलगा, पाहा दुर्घटनेचा थरारक VIDEO

दोन दिवसांपूर्वी गायीनं एका लहान मुलाला तुडवल्याची घटना ताजी असतानाच आणि एक प्रकार समोर आला आहे.

  • Share this:

आगरा, 21 फेब्रुवारी: प्राणी सहसा कुणालाही इजा पोहोचवत नाहीत. मात्र प्राण्यांनाही राग अनावर झाला की ते कुणाचं ऐकत नाहीत. गायीच्या दाव्यात गुरफटून काही अंतर मुलगा फरफटत गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना उत्तर प्रदेश इथल्या आगरा परिसरात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गायीच्या दाव्यात या मुलाचा हात अडकला आणि गाय त्याला घेऊन सैरभैर पळत सुटली. स्थानिकांनी गायीला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तिने कुणालाही जुमानलं नाही. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता मुलगा गायीला बांधत होता. त्यावेळी गायीचा राग अनावर झाला आणि ती वाऱ्याच्या वेगान सुसाट पळत सुटली. दाव्यामध्ये हात अडकल्यानं मुलाला आपला हातही सोडवून घेता आला नाही आणि गाय थांबायचं नावही घेत नव्हती. सध्या जखमी मुलावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अशीच एक दुसरी घटना पंजाबमधून बुधावरी समोर आली होती. गाईने लहान मुलाला तुडवलं, पूर्ण व्हिडिओ पाहण्याचं धाडसं होणार नाही.

प्राण्यांकडून माणसांवर हल्ले होण्याचे प्रकार अधूनमधून समोर येत असतात. जंगली प्राणी मानवी वस्तीत आल्यानंतर त्यांच्याकडून हल्ला होण्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. आता गावात मोकाट फिरणाऱ्या एका गाईने लहान मुलावर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पिसाळलेल्या गाईने मुलाला अक्षरश तुडवलं आहे. यावेळी गावकऱ्यांनी गाईला दगड मारून, काठीने हुसकावण्याचा प्रयत्न केला मात्र मुलाची सुटका होऊ शकली नाही.

पंजाबच्या मुक्तसर इथला हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. थांदेवाला रोडवर एका सीसीटीव्हीत गाय मुलाला मारत असल्याचं कैद झालं आहे. या व्हिडिओमध्ये गाय मुलाला पायाने तुडवत असताना दिसत आहे. मुलाला वाचवण्यासाठी गावचे लोक आजुबाजुला दिसतात. गाईला पळवून लावण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. पण गाय मुलाला शिंगानेसुद्धा मारहाण करत राहते. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2020 02:49 PM IST

ताज्या बातम्या