• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार; भाजप कार्यालयातील जाळपोळीचा LIVE VIDEO

निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार; भाजप कार्यालयातील जाळपोळीचा LIVE VIDEO

नंदीग्राम मतदारसंघातून (Nandigram constituency) ममतादीदींना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

 • Share this:
  कोलकाता, 2 मे : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Election Result) आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार ममता बँनर्जींच्या तृणमूल कॉग्रेसला बहुमत मिळालं आहे. तर दुसरीकडे द्विशतकाचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपला शंभरीही गाठता आलेली नाही. दरम्यान विजयाच्या वृत्तानंतर पश्चिम बंगालमध्ये आनंदाचं चित्र आहे. मात्र काही ठिकाणी हिंसाचार झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी याबाबत तृणमूल काँग्रेसवर आरोप केला आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात आग लावली असून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. संबित पात्राने एका वृत्त वाहिनीवर सांगितलं की, पश्चिम बंगालमध्ये तीन ठिकाणी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार केला आहे. संबित पात्रा म्हणाले की, बेलाघाट येथे भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला, दुसरीकडे सिखपूर येथेही तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दुकानावर हल्ला केला. दुपारी 1 वाजताच्या दरम्यानही तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर दगडफेक आणि कार्यकर्त्यांच्या बाईक जाळल्याचा आरोप केला आहे. हे ही वाचा-दीदींना मोठा विजय मिळवून देऊनही निवडणूक 'चाणक्यां'चे संन्यास घेण्याचे संकेत पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये  (West Bengal Assembly Election Result) तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)यांनी आपला गड राखत भाजपला (BJP) धूळ चारली आहे. पण, नंदीग्राम मतदारसंघातून (Nandigram constituency) ममतादीदींना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सुरुवातीला ममतादीदी जिंकल्या असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण,  भाजपचे उमेदवार सुवेंद्र अधिकारी (Suvendra Adhikari) विजयी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: