VIDEO मधून समोर आलं पावसाचं रौद्र रुप; पाण्याच्या लाटांसोबत गाड्याही गेल्या वाहून

VIDEO मधून समोर आलं पावसाचं रौद्र रुप; पाण्याच्या लाटांसोबत गाड्याही गेल्या वाहून

येथे पावसामुळे तब्बल 50 जणांचा मृत्यू झाला आहे

  • Share this:

हैदराबाद, 18 ऑक्टोबर : मुसळधार पावसामुळे हैदराबादमधील अनेक भागात पूरपरिस्थितीत निर्माण झाली आहे आणि तब्बल 50 जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसामुळे हजारो-कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. शहरातील अनेक भागात शनिवारी सायंकाळी धो-धो पाऊस सुरू होता. शहरात 150 मिमीहून अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे शिवाय ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रस्त्यांवर 2 फूटांहून अधिक पाणी भरल्याचे दिसत आहे. हैदराबादच्या हवामान कार्यालयाने सांगितले की, रविवारी हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने गुरुवारी सांगितले की, पावसामुळे 50 जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक अनुमानानुसार या पावसामुळे साधारण 9000 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. अधिकाऱ्यांकडून पुरग्रस्त भागात मदतकार्य केलं जात आहे. अनेक भाग ते पाण्यात बुडाले आहेत. अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.

Published by: Manoj Khandekar
First published: October 18, 2020, 5:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading