VIDEO : 'ये कितना अजीब है', मोदींच्या फिटनेस व्हिडिओवर राहुल गांधी खळखळून हसले

VIDEO : 'ये कितना अजीब है', मोदींच्या फिटनेस व्हिडिओवर राहुल गांधी खळखळून हसले

राहुल गांधींनी विचारलं की, तुम्ही पंतप्रधान मोदींचा फिटनेसचा व्हिडिओ पाहिला का ?, त्यानंतर कुणीच काही उत्तर न दिल्यामुळे राहुल गांधींनीच 'ये कितना अजीब है'

  • Share this:

नवी दिल्ली, 13 जून : काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच इफ्तार पार्टीचं आयोजन केलं. दिल्लीत ताज पॅलेस या पंचतारांकीत हाॅटेलमध्ये धार्मिक आणि राजकीय नेत्यांच्या मांदियाळीत विरोधी पक्षांसह ही पार्टी पार पडली.

या इफ्तार पार्टीला काँग्रेसने 18 राजकीय पक्षांच्या निमंत्रित केलं होतं. पण, या इफ्तार पार्टीला 10 पक्षच सहभागी झाले.या इफ्तार पार्टीमध्ये राहुल गांधी यांनी मुस्लिम टोपी घातली होती. या दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेस चॅलेंजच्या व्हिडिओचा उल्लेख झाला. त्यावर एकच हास्यकल्लोळ उडाला.

राहुल गांधींनी विचारलं की, तुम्ही पंतप्रधान मोदींचा फिटनेसचा व्हिडिओ पाहिला का ?, त्यानंतर कुणीच काही उत्तर न दिल्यामुळे राहुल गांधींनीच 'ये कितना अजीब है' असं म्हटलं आणि एकच हास्यकल्लोळ उडाला. त्यांच्या या वक्तव्यानंतर दिनेश त्रिवेदी आणि सीताराम येंचुरी विनोदात सहभागी झाले.

त्यानंतर राहुल गांधींनी सीताराम येंचुरींना, तुम्ही तुमचा फिटनेसचा व्हिडिओ तयार केला का ? असा सवाल विचारला असता येंचुरी पुन्हा हास्यकल्लोळात बुडाले.

VIDEO : मोदींनी पूर्ण केलं फिटनेस चॅलेंज, पहा हा व्हिडिओ

18 पक्षांना निमंत्रण

या इफ्तार पार्टीसाठी काँग्रेसकडून 18 राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात आलं होतं. सोनिया गांधी यांनी 2015 मध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं.

दरम्यान, काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत आज प्रणव मुखर्जी उपस्थित राहिले. या इफ्तार पार्टीला प्रणव मुखर्जीना निमंत्रण नाही असं सुरुवातील वृत्त होतं मात्र नंतर खुद्द राहुल गांधी यांनी प्रणव मुखर्जींना निमंत्रण दिलं आणि ते या इफ्तारला उपस्थितही राहिले.

First published: June 13, 2018, 11:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading