Pulwama : पाकने सीमेजवळ रणगाडे पाठवल्याचा VIDEO; म्हणे आम्ही भारतावर प्रतिहल्ला करण्यासाठी सज्ज

Pulwama : पाकने सीमेजवळ रणगाडे पाठवल्याचा VIDEO; म्हणे आम्ही भारतावर प्रतिहल्ला करण्यासाठी सज्ज

पाकिस्तानी रणगाडे सियालकोट सीमेजवळ तैनात व्हायला निघाल्याचा एक व्हिडिओ पाकिस्तानी ट्विटर अकाउंटवर शेअर झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : पाकिस्तानी रणगाडे सियालकोट सीमेजवळ तैनात व्हायला निघाल्याचा एक व्हिडिओ पाकिस्तानी ट्विटर अकाउंटवर शेअर झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तान सीमेजवळ युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असल्याचे संकेत मिळत आहेत. पण याबाबत भारताकडून अद्याप कुठल्याही हालचालींसंदर्भात दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची घेतली बैठक घेतल्याचं वृत्त आहे. भारताकडून जर गोळीबार झाला  सडेतोड उत्तर देण्याचे आदेश पाकिस्तान आर्मीला देण्यात आले आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर जागतिक पातळीवरून होणाऱ्या टीकेने पाकिस्तान बिथरल्याची चिन्हं दिसत आहेत. काश्मीर खोऱ्यात जैश ए मोहम्मदकडून CRPF च्या ताफ्यावर हल्ला झाला. त्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. याची धास्ती आता पाकिस्तानने घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील अनेक गावं स्थलांतरीत करण्यात आली आहेत. त्याचबरोबर अनेक भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या लाईन ऑफ कंट्रोल(LoC )जवळील लोकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील 127 गावांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच LoC जवळील 40 पेक्षा जास्त गावं खाली करण्यात आली आहेत.

पाकिस्तानचा दहशतवादी मसूद अजहरला जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर मुख्यालयातून काढून बाहेर लपवण्यात आलं आहे. पाकिस्तान सरकारने मसूद अजहरला रावलपिंडीमध्ये एका सुरक्षित स्थळी हलवलं असल्याची माहिती समोर आली आहे. रावलपिंडीमध्ये पाकिस्तानची गुप्तचर एजेंसी असलेल्या ISI चं मुख्यालय आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 06:22 PM IST

ताज्या बातम्या