मराठी बातम्या /बातम्या /देश /

CDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात; Ground Zero वरुन पहिला VIDEO

CDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात; Ground Zero वरुन पहिला VIDEO

तमिळनाडू येथील कुन्नूर भागात लष्कराचं विमान कोसळलं आहे (Military chopper crashes in Tamil Nadu). या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 08 डिसेंबर : तमिळनाडू येथील कुन्नूर भागात मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे (Military chopper crashes in Tamil Nadu).  लष्कराचे वरिष्ठ अधिकारी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS बिपीन रावत (CDS Gen Bipin Rawat) हेदेखील या हेलिकॉप्टरमध्ये होते. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे (Chopper Crash Video). यात हेलिकॉप्टर पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याचं पाहायला मिळतं.

Breaking : कुन्नूरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये CDS बिपीन रावत, त्यांचे कुटुंबीय आणि अधिकारी प्रवास करत होते. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. तर, तीन जण जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवणयाचा प्रयत्न सुरु आहे. यात दोनजण दगावल्याची माहिती समोर येत आहे. दोन मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

भारतीय हवाई दलानेही ट्विट करत या घटनेबद्दल माहिती दिली आहे. या हेलिकॉप्टरने बिपीन रावतही प्रवास करत असल्याचं यात सांगण्यात आलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण प्रवासी करत होते. यामध्ये बिपीन रावत, बिपीन रावत यांच्या पत्नी, लष्कराचे काही अधिकारी तसेच इतर सुरक्षारक्षक, कमांडोज उपस्थित होते.

First published:

Tags: Helicopter