मराठी बातम्या /बातम्या /देश /Smart Goat चार खाण्यासाठी बकरीने केला जुगाड, Video पाहून कराल कौतुक!

Smart Goat चार खाण्यासाठी बकरीने केला जुगाड, Video पाहून कराल कौतुक!

बकरीचा चारा खाऊन पूर्ण होईपर्यंत त्या म्हशीनेही तिचा चांगलीच साथ दिली. सोशल मीडियावर हा VIDEO चांगलाच व्हायरल होत आहे.

बकरीचा चारा खाऊन पूर्ण होईपर्यंत त्या म्हशीनेही तिचा चांगलीच साथ दिली. सोशल मीडियावर हा VIDEO चांगलाच व्हायरल होत आहे.

बकरीचा चारा खाऊन पूर्ण होईपर्यंत त्या म्हशीनेही तिचा चांगलीच साथ दिली. सोशल मीडियावर हा VIDEO चांगलाच व्हायरल होत आहे.

    नवी दिल्ली 26 जून: भारतीय लोक जुगाड टेक्नॉलॉजीसाठी (jugad technology) प्रसिद्ध आहेत. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. चारा खाण्यासाठी एका बकरीने जो जुगाड केला तो पाहून नेटकरी तिला चांगलीच दाद देत आहेत. IFS अधिकारी सुधा रामन यांनी आपल्या टिव्टर हँडलवर हा VIDEO शेअर करत त्या बकरीला Smart Goat असं म्हटलं आहे. तर लोकांनीही बकरीच्या त्या कामाला दाद देत तिला शाब्बासी दिलीय.

    देशातल्या मोठ्या भागात अजुनही पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे जमीनीवर गवत उगवलेलं नाही. चाऱ्याच्या शोधात निघालेली बकरी एका झाडाजवळ येऊन थांबली. हिरवगार झाड दिसल्याने तिला आपल्याला चारा मिळणार हे लक्षात आलं. मात्र झाडाच्या फांद्या या थोड्या उंचीवर होत्या.

    तेवढ्या उंचीवर तिला चारा खाणे शक्यच नव्हते. त्याच झाडाली एक म्हैस बांधलेली होती. बकरीने अंदाज घेतला आणि  बकरीने चक्क त्या म्हशीच्या पठिवरच उडी घेतली. म्हशीच्या पाठिवर गेल्यावर तिने दोन पाय झाडावर लावले आणि झाडाचा चारा ती खाऊ लागली.

    म्हैस आणि बकरीची ही मैत्री पाहून सगळ्यांनाच आश्चर्यही वाटलं आणि तिचं कौतुुकही वाटलं. झाडाचा हिरवा पाला खाऊन झाल्यावर तशीच तिने म्हशीच्या डोक्यावरून खाली उडी घेतली. म्हशीची मान खाली असल्याने बकरीला उडी मारणं सोपं गेलं.

    तिची ही युक्ती पाहून लोकही जाम खूष झालेत. जेव्हा गरज असते तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी फक्त माणसेच नाही तर प्राणीही काय वाट्टेल ते करतात अशी प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त  केली.

    बकरीचा चारा खाऊन पूर्ण होईपर्यंत त्या म्हशीनेही तिचा चांगलीच साथ दिली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

    संपादन - अजय कौटिकवार

     

     

    First published:

    Tags: Goat, Viral videos