Home /News /national /

संरक्षण मंत्री LoC वर पोहोचले तेव्हाचा VIDEO सरसरून काटा आणेल; 'भारत माता की जय' ने अवकाश दुमदुमलं!

संरक्षण मंत्री LoC वर पोहोचले तेव्हाचा VIDEO सरसरून काटा आणेल; 'भारत माता की जय' ने अवकाश दुमदुमलं!

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. ते पाकिस्तान सीमेजवळ LoC वर पोहोचले त्या वेळी भारतीय जवानांनी केलेल्या जयघोषणाचा हा VIDEO अंगावर काटा उभा करेल.

    नवी दिल्ली, 18 जुलै : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लडाखहून आता जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. काश्मीर खोऱ्यात सीमेजवळच्या लष्कराच्या चौक्यांवर राजनाथ यांनी हजेरी लावली आणि सीमेवर तैनात जवानांची भेट घेतली. संरक्षण मंत्र्यांनी प्रत्यक्ष ताबारेषेजवळ (LoC) असलेल्या अग्रणी चौक्यांपाशी पोहोचले, त्या वेळी लष्करी जवानांनी 'भारत माता की जय' चा जयघोष केला. तो VIDEO व्हायरल झाला आहे. देशभक्तीचं स्फुल्लिंग फुलवणारा हा VIDEO अंगावर सरसरून काटा आणेल असा आहे. राजनाथ सिंह यांनी लडाखमध्ये शुक्रवारी चीन सीमेजवळच्या भारतीय लष्कराच्या चौक्यांना भेट दिली, तर शनिवारी काश्मिरात पाकिस्तान सीमेजवळच्या लष्करी फौजांशी त्यांनी संवाद साधला. राजनाथ सिंह यांनी कुपवाडा जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या पोस्टना भेट दिली. या भेटीदरम्यान शस्त्रास्त्रं आणि दारूगोळा यांचाही आढावा घेतला. संरक्षण मंत्री शुक्रवारी लडाखच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी चीनच्या सीमेजवळच्या लष्करी चौक्यांना भेट दिली. सैन्यदलांचे प्रमुख (CDS)जनरल बिपीन रावत आणि लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणेदेखील या वेळी संरक्षण मंत्र्यांबरोबर होते. लेहच्याजवळ लुकूंज चौकीजवळ त्यांनी जवानांची भेट घेतली. त्यानंतर शनिवारी राजनाथ पाकिस्तान सीमेजवळच्या लष्करी चौक्यांना भेट देत आहेत. कुपवाडा जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ त्यांनी लष्कराच्या सज्जतेची पाहणी केली.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Rajnath Singh (Politician)

    पुढील बातम्या