तुम्ही पाहिला का स्त्री स्वातंत्र्याचा हा आगळा वेगळा व्हिडिओ?

तुम्ही पाहिला का स्त्री स्वातंत्र्याचा हा आगळा वेगळा व्हिडिओ?

हा व्हिडिओ 10 ऑगस्टला अपलोड केला गेला होता. या व्हिडिओत एक महिला बाईक चालवताना दिसते आहे

  • Share this:

15 ऑगस्ट :आज भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष पूर्ण झाले. याच निमित्ताने 'स्त्रीस्वातंत्र्य म्हणजे काय?' हे सांगणारा एक व्हिडिओ बजाज अॅव्हेन्जर्सने रिलीज केलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय.

हा व्हिडिओ 10 ऑगस्टला अपलोड केला गेला होता. या व्हिडिओत एक महिला बाईक चालवताना दिसते आहे. ती कुणालाही न घाबरता बाईक चालवते आहे. तिला हवी तशी बाईक ती चालवते आहे. तसंच तिचा आवडता पोषाख तिने केला आहे. हवं तेव्हा हवं त्या ठिकाणी ती थांबतेही आहे. एवढंच नाही तर रात्रीसुद्धा निडरपणे ती गाडी चालवते आहे. यातून स्त्री स्वतंत्र असणे म्हणजे काय याचा अर्थ उमगतो.

व्हिडीओच्या शेवटी महात्मा गांधींचे एक वचन लिहून येते ज्यात ते म्हणतात ,ज्या दिवशी रात्रीही महिला मुक्तपणे रस्त्यांवर फिरू शकतील त्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं असं खऱ्या अर्थाने म्हणता येईल.

First published: August 15, 2017, 11:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading