मराठी बातम्या /बातम्या /देश /VIDEO : पक्षाशी गद्दारी नाही, कुराणावर हात ठेवून उमेदवारांना घ्यावी लागली शपथ; काँग्रेसवर आली ही वेळ

VIDEO : पक्षाशी गद्दारी नाही, कुराणावर हात ठेवून उमेदवारांना घ्यावी लागली शपथ; काँग्रेसवर आली ही वेळ

या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे

या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे

या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे

इंदूर, 8 फेब्रुवारी : इंदूरमध्ये काँग्रेस नेत्याने पक्षासोबत प्रामाणिक राहण्यासाठी अल्पसंख्यांक उमेदवारांना कुराणावर शपथ घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सांगितलं जात आहे की, हा व्हिडिओ 2 फेब्रुवारीचा असून जेव्हा चंदन नगरमध्ये काँग्रेसचे शहर काँग्रेस अध्यक्ष विनय वाकलीवाल यांनी काँग्रेसला साथ देण्यासाठी नगरसेवक पदावर संभावित अल्पसंख्यांक उमेदवारांना एकजूट राहण्यासाठी कुराणची शपथ घेण्यास सांगितलं होतं.

हे ही वाचा-गोहत्या बंदी विधेयकामुळे मोठा गदारोळ;काँग्रेस नेत्याने परिषदेत बिलाची प्रत फाडली

भाजपने या मुद्द्यावरुन टीका केली आहे. भाजपने दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस मुसलमानांचा अपमान करीत आहे. अशा प्रकारे कधी हिंदूंना गीतेची शपथ घेण्यास सांगण्यात आलं आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शहर काँग्रेस अध्यक्ष विनय वाकलीवाल यांचं म्हणणं आहे की, व्हिडिओ एडिट करुन काँग्रेसला बदनाम करण्याचा कट आखला जात आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काँग्रेसने अल्पसंख्यांकांना अशा प्रकारे पक्षाशी प्रामाणिक राहण्यासाठी शपथ कशी काय दिली जाऊ शकते, असा सवाल केला जात आहे. सोशल मीडियावरदेखील यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. यापूर्वी कधीच असा प्रकारची वागणूक कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांना दिली गेली नसल्याची प्रतिक्रिया येत आहे.

First published:

Tags: BJP, Congress