15 ऑगस्ट : ग्वालियर मंत्री आणि माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाची कांता मिश्रा यांनी त्यांच्या अटलजींच्या आठणींना उजाळा दिला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती संध्या चिंताजनक आहे. त्याबद्दल कांता यांना विचारलं असता त्या भावूक झाल्या. प्रत्येक महिन्याला एकमेकांशी बोलणारे आम्ही गेल्या 9 वर्ष बोललो नाही असं म्हणताना कांता यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी अटलजींना नेहमी खंबीर उभं राहताना पाहिलं आहे, त्यामुळे त्यांना मी असं आजारी नाही पाहू शकत असंही त्या म्हणाल्या. त्यांच्या या भावना एकूण तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.