Home /News /national /

VIDEO : सुवर्ण मंदिरात भयावह प्रकार; गुरुग्रंथ साहेबजवळ पोहोचला तरुण, जमावाकडून मारहाणीत मृत्यू

VIDEO : सुवर्ण मंदिरात भयावह प्रकार; गुरुग्रंथ साहेबजवळ पोहोचला तरुण, जमावाकडून मारहाणीत मृत्यू

पंजाबमधील (Punjab News) सुवर्ण मंदिरात (Golden Temple) शनिवारी गुरू ग्रंथ साहेबाचा अपमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची जमावाकडून हत्या करण्यात आली.

  अमृतसर, 18 डिसेंबर : पंजाबमधील (Punjab News) सुवर्ण मंदिरात (Golden Temple) शनिवारी गुरू ग्रंथ साहेबाचा अपमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची हत्या करण्यात आली. तरुणाने मंदिरातील सचखंड साहेबच्या आतील गेट पार करीत गुरु ग्रंथ साहेबचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. तरुणाने तेथे ठेवलेली तलवार देखील उचलली होती. त्याचवेळी सुरक्षारक्षकांनी त्याला पकडले. सुरक्षा रक्षकांनी तरुणाला तातडीने शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या हवाली (SGPC) केलं. SGPC पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, मंदिरातील लोकांनीच तरुणाला जबर मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. हा तरुण उत्तर प्रदेशातील असल्याचं सांगितलं जात आहे. हे ही वाचा-बंगळुरूतील घटनेचे पडसाद; बेळगावात तणाव वाढला, 27 जणांना अटक अन् जमावबंदीचे आदेश सायंकाळी 6 वाजता पाठ सुरू असताना घडली घटना सुवर्ण मंदिरात सचखंड साहेबच्या आत शनिवारी सायंकाळी साधारण 6 वाजता रहरास (सायंकाळच्या वेळी श्री गुरु ग्रंथ साहेब यांची केली जाणारी प्रार्थना) सुरू होता. नेहमीप्रमाणे भक्त दर्शनासाठी आले होते. सचखंड साहेबमध्ये श्री गुरु ग्रंथ साहेबच्या पुढे सुरक्षाच्या कारणास्तव गेट तयार करण्यात आली आहे. संगतच्या रांगेत सामील तरुणाने त्याची वेळ आल्यानंतर सचखंड साहेबच्या आत पोहोचला आणि अचानक सुरक्षेसाठी लावलेला गेट ओलांडून गुरु ग्रंथ साहेबच्या दिशेने गेला.

  यानंतर तेथे गोंधळ उडाला. सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं. तेेथे उपस्थित असलेल्यांनी सांगितलं की, तरुणाने श्री गुरु ग्रंथ साहेबच्या समोर ठेवलेली तलवार उचलण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी सांगितलं की, तो गुरु ग्रंथ साहेबच्या समोर ठेवलेली फूलं उचलण्याचा प्रयत्न करीत होता. दरम्यान तेथील लोकांनी त्याला जबर मारहाण केली व यातच त्याचा मृत्यू झाला.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Punjab

  पुढील बातम्या