नवी दिल्ली, 24 मार्च : देश सध्या कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) प्रसार थांबविण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्र आणि सर्व राज्य सरकारकडून सोशल डिस्टन्सिंगची अपील केली जात आहे. त्यासाठी सरकारकडून लॉकडाऊनसह (Lockdown) अनेक प्रभावी पावले उचलली जात आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे क्रुर रुप समोर आले आहे. इंडिगो (Indigo) एअरलाइन्समध्ये विमान कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर तिच्यासोबत घडलेली एक घटना शेअर केली.
इंडिगो एअरलाइन्समध्ये काम करणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात तिने सांगितलं आहे की, ‘ती विमानसेवेत काम करीत असल्याने सोसायटीत सदस्यांकडून तिच्याकडे संशयित नजरेने पाहिलं जात आहे. जेव्हा ती कामावर जाते, तेव्हा सोसायटीतील लोक तिच्या आईला धमकी देतात. तरुण शुक्ला यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये महिला कर्मचारी रडत आहे. ती म्हणते, 'माझ्याबाबत लोक अफवा पसरवत आहेत. मी कोरोना पॉझिटिव्ह नाही.’
Can't believe how people are treating our airline crew. This @IndiGo6E crew is nearly broken from being discriminated & taunted. When she is gone for her flight, her mother is even refused groceries in her society. Police is also not helping. @amitshah#coronavirus#india. pic.twitter.com/yuuTnYhqKq
काहीजण घरी येऊन माझ्या आईला धमकी देत असल्याचा दावा महिलेने केला आहे. जर कोणी कोरोना पॉझिटिव्ह असला तरी अशा पद्धतीने वागणूक देणं हा अपराध नाही का? तिने आरोप केला आहे की या प्रकरणात पोलीस तिची मदत करीत नाही.
आईला वस्तू खरेदी करण्याची परवानगी नाही
व्हिडीओमध्ये महिला सांगते की, ‘मी आणि माझी आई आम्ही दोघेचं घरी असतो. आई दुकानातून वस्तू खरेदी करायला जाऊ शकत नाही. तुमच्या मुलीला कोरोना झाला असल्याने तो तुम्हालाही झाला असेल असं म्हणत तिला हिणवतात. माझी विनंती आहे की, माझ्या आईला त्रास देऊ नका’.