Home /News /national /

Video : चित्रपटगृहात आलाय का? IAS अधिकाऱ्याचा पोशाख पाहून न्यायाशीध संतापले, सर्वांसमोर घेतली शाळा

Video : चित्रपटगृहात आलाय का? IAS अधिकाऱ्याचा पोशाख पाहून न्यायाशीध संतापले, सर्वांसमोर घेतली शाळा

या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Video viral on Social media) व्हायरल होत आहे.

    पाटना, 12 जून : देशातील न्यायालयांमध्ये ऑनलाइन कारवाईदरम्यान अशी काहीशी परिस्थिती निर्माण होते, ज्याचे व्हिडीओ व्हायरल होतात. पाटना हायकोर्टाचा (Patna Highcourt) असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Video viral on Social media) व्हायरल होत आहे. बिहार सरकारचे प्रधान सचिव (IAS Officer) आनंद किशोर यांना पाटना हायकोर्टात एका कारवाईदरम्यान शर्टावरुन न्यायाधीशांनी फटकारलं. आयएएस अधिकाऱ्यांनी शर्टाची कॉलर खुली ठेवली होती. यावर न्यायाशीध चांगलेच तापले. पांढरा शर्ट आणि खुली कॉलर घेऊन न्यायालयात कारवाईसाठी पोहोचलेल्या आयएएस अधिकारीवर न्यायाशीध संतापले. न्यायाधीश म्हणाले की, कोर्टात कसा ड्रेस कोड घालून यायचा याबाबत तुम्हाला माहिती नाही का? तुम्ही मसूरीमध्ये आयएएस ट्रेनिंग शाळेत गेला नाही का? पाटना हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी पुढे सांगितलं की, हे काय आहे? बिहार राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांना काय अडचण आहे. कोर्टात कसं यावं याबद्दल त्यांना माहिती नाही का? औपचारिक पोशाखाचा अर्थ कमीत कमी एक कोट आहे आणि कॉलर बंद असायला हवी. यानंतर अधिकारी म्हणाला की, उन्हाळ्यात कोट घालण्यासाठी काही अधिकृत कोड नाही. मात्र न्यायाधीशाला हे स्पष्टीकरण पटलं नाही. ते म्हणाले की, जेव्हा कधी तुम्ही न्यायालयात येता तेव्हा योग्य ड्रेस कोड असायला हवा. तुम्हाला काय वाटतं, हा सिनेमा हॉल आहे?  सोशल मीडियावर शेअर केलाला दोन मिनिटांच्या व्हिडीओत असं म्हटल्याचं दिसत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bihar, Court, Ias officer

    पुढील बातम्या