VIDEO : बजेटबाबत मीडियाशी बोलत होते केंद्रीय मंत्री, पाठीमागे मुलगी दाखवत होती वाकुल्या

हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 1, 2019 11:00 PM IST

VIDEO : बजेटबाबत मीडियाशी बोलत होते केंद्रीय मंत्री, पाठीमागे मुलगी दाखवत होती वाकुल्या

01 फेब्रुवारी : अर्थमंत्री पियूष गोयल यांनी आज शुक्रवारी अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. अर्थसंकल्पाबाबत नागरिक उड्डयाण राज्यमंत्री जयंत सिन्हा संसद भवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तेव्हा त्यांच्या पाठीमागे एक मुलगी विचित्र हावभाव करत होती. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अर्थसंकल्प संपल्यानंतर जयंत सिन्हा संसद भवनाबाहेर मीडियाच्या प्रतिनिधींशी संवाद साधत होते. अर्थसंकल्पाबद्दल त्यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे. परंतु, ते जेव्हा बोलत होते, तेव्हा त्यांच्या पाठीमागे एक मुलगी उभी होती. तिने समोर कॅमेरा पाहिला आणि वाकुल्या दाखवण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि ही मुलगी कोण आहे असा सवाल उपस्थितीत केला जात आहे.


Loading...
=========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2019 11:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...