मराठी बातम्या /बातम्या /देश /गुजरातमधील पाचवी नापास आमदाराने दिलं कोरोना रुग्णाला रेमडेसिवीरचं इंजेक्शन, VIDEO व्हायरल

गुजरातमधील पाचवी नापास आमदाराने दिलं कोरोना रुग्णाला रेमडेसिवीरचं इंजेक्शन, VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसने आमदारावर टीका केली आहे.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसने आमदारावर टीका केली आहे.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसने आमदारावर टीका केली आहे.

सुरत, 23 मे : देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. अशातच गुजरातमधून एक व्हिडीओ समोर आला आहे. गुजरात येथील कामरेजचे भाजपचे आमदार व्ही.डी. झालावाडिया हे कोरोना रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन देत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. झालावाडिया हे सूरत महानगर पालिकेच्या सहकार्याने सुरू असलेल्या कम्युनिटी कोविड सेंटरमध्ये एका कोरोना रुग्णाच्या सलाइनमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन भरत होते. त्यांनी रुग्णाला लावलेल्या सलाईनमध्ये ते इंजेक्शन सिरींज रिकामी केलं.

झालावाडिया हे पाचवी नापास आहे, आणि असं असतानाही ते कोरोना रुग्णावर उपचार कसा करू शकतात, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. काँग्रेसने झालावाडिया यांच्यावर टीका केली आहे. या प्रकरणानंतर झालावाडिया यांनी सांगितलं की, मी गेल्या 40 दिवसांपासून सर्थाना कम्युनिटी हॉलमध्ये स्वयंसेवा करीत आहे. मी फक्त रेमडेसिवीरचं इंजेक्शन सिरींजमध्ये भरलं. कोणालाही इंजेक्शन दिलेलं नाही. माझ्या जवळपास त्यावेळी 10 ते 15 डॉक्टर उपस्थित होते.

हे ही वाचा-मास्कमधून पसरतोय Black Fungus? तुम्ही ही चूक तर करीत नाही ना...

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसने आमदारावर टीका केली आहे. डॉक्टर असताना प्रशिक्षण नसलेल्या आमदारांची कोरोना रुग्णांला इंजेक्शन कसं दिलं, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

First published:

Tags: Corona updates, Gujrat, Viral video.