VIDEO : शेतकरी आंदोलन पेटलंय; उत्तर प्रदेश सीमेवर राज्यमंत्री बच्चू कडू यांचा ताफा रोखला

VIDEO : शेतकरी आंदोलन पेटलंय; उत्तर प्रदेश सीमेवर राज्यमंत्री बच्चू कडू यांचा ताफा रोखला

उत्तर प्रदेशातील पोलिसांनी आता दडपशाही सुरू केली असून दिल्लीत जाता येऊ नये म्हणून सर्व मार्गावर पोलिसांनीच चक्का जामच्या नावाखाली बंद केला आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.

  • Share this:

ग्वालियर, 9 डिसेंबर /संजय शेंडे :  केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी निघालेले महाराष्ट्राचे मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु यांच्या वाहनांचा ताफा आज (9 डिसेंबर) उत्तर प्रदेश पोलिसांनी युपीच्या सीमेवर धौलपूर जवळ रोखला. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी आता दडपशाही सुरू केली असून दिल्लीत जाता येऊ नये म्हणून सर्व मार्गावर पोलिसांनीच चक्का जामच्या नावाखाली बंद केला आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.

ग्वालियर येथून भरतपूर मार्गावरुन जाण्यासाठी बच्चू कडु यांच्या वाहनांचा ताफा निघाला होता. मात्र राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरील धौलपूरला येताच उत्तर प्रदेश पोलिसांनी वाहनांचा ताफा रोखला. पुढे आग्रा व इतर भागात चक्का जाम असल्याचे कारण पुढे केल्याने पर्यायी भरतपूर मार्गे ताफा नेण्यास पोलिसांनी सांगितले. परंतू भरतपूरपासून पुढचे सगळे मार्ग उत्तर प्रदेश पोलिसांनी स्वतःहून बंद केल्याने आज  भरतपूरलाच गुरूद्वारात मुक्काम करावा लागला.

महाराष्ट्राचे मंत्री बच्चू कडू यांना जागो जागी समर्थन मिळत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार धास्तावले असून बच्चू कडू यांना युपीत प्रवेशच मिळू द्यायचा नाही या हेतूने त्यांचे सर्व मार्ग रोखले जात आहेत, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. उत्तर प्रदेशात दाखल होत बुधवारी  हजारो समर्थकांचा मथुरा-वृंदावनला मुक्काम होता. मात्र बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मथुरा वृंदावन जाण्यास उत्तर प्रदेश पोलिसांनी  मनाई केली. त्यामुळे ऐन वेळी कडू यांना भरतपूरला मुक्काम करावा लागला असून उद्या गुरूवारी (ता.10) सकाळी हजारो समर्थकांचा ताफा पलवलच्या दिशेने रवाना होणार आहे.

दिल्ली सीमेवरील पलवल येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असून या आंदोलनात बच्चू कडू आपल्या सहकाऱ्यांसह सहभागी होणार आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: December 9, 2020, 11:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading