VIDEO धक्कादायक! थेट मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर भर रस्त्यात झाला हल्ला

VIDEO धक्कादायक! थेट मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर भर रस्त्यात झाला हल्ला

केरळच्या रस्त्यावर भर दिवसा एक धक्कादायक प्रकार घडला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या ताफ्यावर डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला.

  • Share this:

कन्नूर (केरळ), 24 डिसेंबर : केरळच्या रस्त्यावर भर दिवसा एक धक्कादायक प्रकार घडला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या ताफ्यावर डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. CPI(M) च्या युथ विंगच्या गुंडानी हा हल्ला केल्याचं भाजपचं म्हणणं आहे. डाव्या पक्षांच्या मोर्चातील काही DYFI च्या (Democratic Youth Federation of India )गुंडांनी हा हल्ला केल्याचं स्थानिक बातम्यांमध्ये म्हटलं आहे.

केरळमध्ये गुरुवायूर आणि इतर मंदिरांच्या दर्शनाला गेलेल्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर केरळमध्ये अशा प्रकारे ताफा अडवून हल्ला करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या गाडीच्या चालकाने प्रसंगावधान दाखवून हल्लेखोरांना चुकवत गाडी दामटवल्याने मोठी हानी टळली. केरळच्या पोलिसांनी शेजारी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री येणार हे माहीत असूनही त्यांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली नाही का, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या केरळ भेटीची पूर्वकल्पना असूनही पुरेशी सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली नव्हती, असं या व्हिडीओवरून दिसतं.

केरळ भाजपच्या अधिकृत Twitter हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यापुढे अचानक मोर्चेकरी येतात आणि हल्ला करतात, असं या VIDEO मध्ये स्पष्ट दिसतं. इतर अनेक Twitter Users नी व्हिडिओ शेअर केला आहे.

केरळमध्ये दौऱ्यावर असणाऱ्या येडियुरप्पा यांच्या ताफ्यापुढे पळ्यांगडी इथेही काळे झेंडे दाखवत युथ काँग्रेस आणि DYFI ने निषेध केला होता. त्या वेळी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला अटकही करण्यात आली होती.

--------------------

अन्य बातम्या

CM उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, उपस्थित केला हा महत्त्वाचा मुद्दा

राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्ण पदक स्वीकारण्यास नकार, विद्यार्थिनीने केला निषेध

...आणि राहुल आणि प्रियंका गांधींना पोलिसांनी अर्ध्या रस्त्यातूनच परत पाठवलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2019 04:31 PM IST

ताज्या बातम्या