मराठी बातम्या /बातम्या /देश /

VIDEO : ‘Corona Go..Corona Go’, मुंबईत रामदास आठवलेंची घोषणाबाजी

VIDEO : ‘Corona Go..Corona Go’, मुंबईत रामदास आठवलेंची घोषणाबाजी

ऑन द स्पॉट कविता करण्यासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 10 मार्च : ऑन द स्पॉट कविता करण्यासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले कायम त्यांच्या कवितांसाठी चर्चेत असतात. अगदी व्यासपीठावरुनही ऑन द स्पॉट दोन ओळ्या रचून ते प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणतात.

रामदास आठवले यांची कोरोनासंदर्भातील एक घोषणा सध्या व्हायरल झाली आहे. याचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या संख्येने पाहिला जात आहे.

या व्हिडीओमध्ये रामदास आठवलेंनी कोरोना व्हायरसला भारतातून जाण्यासाठी घोषणाबाजी केली आहे. मुंबईतील कोरोनाच्या जनजागृतीसाठी काही परदेशी नागरिक बॅनर घेऊन उभे होते. आठवलेही त्य़ात सहभागी झाले. हे परदेशी नागरिक मूळचे चीन असल्याचे सांगितले जात आहे. चीनचे भारतातील काऊन्सील जनरल तांग गुइलाई हेही यावेळेस उपस्थित होते. यावेळी रामदास आठवलेंनी ‘गो कोरोना...गो कोरोना’ची घोषणा दिली. यावेळी चीनचे नागरिकही त्यांच्यामागून ‘कोरोना गो’ ची घोषणा देऊ लागले. 35 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये रामदास आठवले हात वर करुन ‘गो कोरोना’ची घोषणा देत आहे.

भारतात आणखी 2 राज्यांमध्ये पोहोचला व्हायरस

भारतात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) धोका वाढला आहे. आता आणखी 2 राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसचे रुग्ण आढळून आलेत. कर्नाटक (Karnataka) आणि पंजाबमध्ये (Punjab) कोरोनाव्हायरसचा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे भारतातील एकूण कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या आता 45 वर पोहोचली आहे. कर्नाटकच्या बंगळुरूत (Bengaluru) एका आयटी इंजिनीअरला कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. कर्नाटकातील हा पहिला रुग्ण आहे.

First published:

Tags: Corona virus, Corona virus in india, India-China, Ramdas aathavale