पाटना, 18 ऑक्टोबर : बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यात पोटनिवडणुका सुरू आहेत. मध्य प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीवर सर्वांची नजर आहे. मात्र यादरम्यान काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भारतीय जनता पक्षाच्या महिला उमेदवारांवर वादग्रस्त टिप्पणी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. भाजपकडून त्यांनी माफी मागण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मध्य प्रदेशातील डबरामध्ये काँग्रेस उमेदवार सुरेंद्र राजेश यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे व्यासपीठावरुन भाषण देत होते. यावेळी ते म्हणाले की, सुरेंद्र राजेश आमचे उमेदवार आहेत. अत्यंत साभे आहेत. हे त्यांच्यासारख्या नाही...काय नाव आहे त्यांचं? मी काय त्यांचं नाव घेऊ, तुम्ही तर माझ्याहून अधिक ओळखला..तुम्ही मला आधीच सावधान करायला हवं होतं...काय आयटम आहे...इमरती देवी या काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाल्या आहेत. इमरती देवांना ज्योतिरादित्य शिंदेचं कट्टर समर्थक मानलं जातं.
#WATCH: Our candidate is not like her... what's her name? (people shout Imarti Devi, who is former State Minister) You know her better and should have warned me earlier... ye kya item hai: Former Madhya Pradesh CM & Congress leader Kamal Nath pic.twitter.com/eW76f2z8gU
माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी टिप्पणी केली आहे. त्यांनी ट्विट करून म्हटलं आहे, कमलनाथजी इमरती देवी त्या गरीब शेतकऱ्याच्या मुलीचं नाव आहे, जिने गावात मजुरी करीत सुरुवात केली आणि आज जनसेवकाच्या रुपात राष्ट्रनिर्माणाच्या कामात सहयोग करीत आहे.