VIDEO : अवघ्या काही फुटांवरून सिंहाला कोंबडीचं लालच, व्हिडिओ व्हायरल

VIDEO : अवघ्या काही फुटांवरून सिंहाला कोंबडीचं लालच, व्हिडिओ व्हायरल

  • Share this:

गुजरात, 08 जून : सिंह जंगलातला रूबाबदारी प्राणी...त्याच्यापुढे भल्याभल्याची भंबेरी उडते. पण, एक व्हिडिओ व्हायरल झाला असून चक्क सिंहाला कोंबडीचं आमिष दाखवून पाळीव प्राण्याप्रमाणे वागणूक दिली जातेय.

ही दृष्य आहेत गुजरातच्या गीर या सिंहाच्या अभयारण्याच्या परिसरातील असल्याचं सांगितलं जातोय. गीरच्या परिसरात अनेक छोटी छोटी गावं आहेत. या गावात राहणारी लोकं प्रामुख्याने शेतकरी आहेत..तर काही जणं छोटी मोठी हॉटेल चालवतात..अशाच एका गावात काही गावकरी एका सिंहाच्या समोर बिनधास्त बसले होते आणि त्याला एक जिवंत कोंबडी खाऊ घालण्याचं आमिष दाखवत आहे.

हे सगळं साधारण ३ ते ५ मिनीटं सुरू राहतं. शेवटी तो गृहस्थ त्या सिंहाच्या पुढ्यात त्या कोंबडीला टाकतो आणि काही क्षणांमधे सिंह ऊसाच्या शेतात गायब होतो. कृपया तुम्ही असं करण्याचा विचारही करू नको.. ते तुमच्या जीवावर बेतू शकतं..

First published: June 8, 2018, 10:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading