VIDEO: माथेफिरू प्रियकराचा प्रेयसीवर गोळीबार, थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

VIDEO: माथेफिरू प्रियकराचा प्रेयसीवर गोळीबार, थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

सीसीटीव्हीत कैद झालेल्या व्हिडिओमध्ये माथेफिरूने प्रेयसीच्या घरासमोरुन तिच्यावर गोळ्या झाडल्याचे दिसत आहे.

  • Share this:

हमीरपूर, 12 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात एका माथेफिरू प्रियकरामुळे खळबळ उडाली आहे. या माथेफिरुने प्रेयसीच्या घरी दिवसा उजेडात घरात घुसखोरी केली आहे. माथेफिरुन तरुणाचे हे कृत्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. सध्या पोलिसांकडुन सीसीटीव्हीच्या आधारावर मारेकऱ्याचा शोध सुरू आहे. ही घटना राठ कोतवाली भागातील खुशीपूर येथील आहे. येथे राहणारे शिवकुमार सोनी यांच्या परिवारावर या भागात राहणाऱ्या अतुल सोनी याने दिवस उजेडात फायरिंग केली. ज्यावेळी हा हल्ला केला तेव्हा शिवकुमार सोनींची आई सावित्री सोनी आपल्या नातीसोबत घरातील दुकानावर बसली होती. शिवकुमार सोनीने सांगितले की, त्यादरम्यान पठानपुरा गंज मोहल्लाचा निवासी अतुल सोनी बाईकवरुन आला. दुकानासमोर बाईक उभी केली. आणि आई व मुलीवर गोळी झाडली. गोळी दुकानाच्या आतील दरवाज्याला भेदून गेली. सुदैवाने या कोणीही गंभीर जखमी झाले नाही.

पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी छापेमारी सुरू केली आहे. या घटमेमागे प्रेम प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप नेमके कारण समोर आलेले नाही. गोळी चालविण्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्हीतील दृश्यावरुन पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत आहे. या व्हिडिओमध्ये मारेकरी बाईकवरुन प्रियसीच्या घराजवळ येऊन थांबल्याचे दिसत आहे. गोळ्या घातल्यानंतर तो तेथून पसार झाला.

अन्य बातम्या

धक्कादायक! मंदिरातून परतत असताना ‘आप’ आमदाराच्या ताफ्यावर गोळीबार, एकाचा मृत्यू

First published: February 12, 2020, 9:35 AM IST

ताज्या बातम्या