मराठी बातम्या /बातम्या /देश /

Video : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमानंतर BJP नेते थेट रुग्णालयात

Video : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमानंतर BJP नेते थेट रुग्णालयात

भाजप नेते तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते. त्यांनी रस्त्यावर येत सर्वांसोबत तिरंगाही फडकवला. मात्र...

  • Published by:  Meenal Gangurde
गांधीनगर, 13 ऑगस्ट : स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने देशभरात तिरंगा यात्रेचं आयोजन केलं जात आहे. गुजरातमध्येही तिरंगा यात्रा काढण्यात आली. या तिरंग्या यात्रेत गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल सामील झाले होते. त्यांच्यासोबत झालेल्या एका अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मेहसाणाजवळ आयोजित केलेल्या तिरंग्या यात्रेदरम्यान नितीन पटेल यांच्यावर गाईने हल्ला केला. या हल्ल्यात नितीन पटेल यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. नितीन पटेल रस्त्यावरुन हातात तिरंगा घेऊन चालत होते. यादरम्यान अचानक एक गाय गर्दीत शिरली. गाईने नितीन पटेल यांना धडक दिली. यामुळे नितीन पटेल खाली कोसळले. यात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचारानंतर नितीन पटेल यांना अहमदाबाद येथे आणण्यात आलं. या यात्रेत शेकडोच्या संख्येने लोक सामील झाले होते. गर्दी पाहून गाईने हा हल्ला केल्याची शक्यता आहे.
First published:

Tags: Gujrat, Independence day, Video viral

पुढील बातम्या