VIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी

VIDEO : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी झाला मोठा अपघात; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये स्फोट होतानाचं दृश्य दिसत आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर रोजी आपला 70 वा वाढदिवस साजरा केला. देशात कोरोनाचा कहर असल्याने देश-परदेशातून मोंदीना अधिकतर जणांना ऑनलाइन शुभेच्छा दिल्या. मात्र काही ठिकाणी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. अशाच एका कार्यक्रमात अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.

या अपघातामुळे 30 भाजप कार्यकर्ते जखमी झाले आहे.

पंतप्रधान मोदींच्या जन्मदिनानिमित्ताने देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियमच्या फुग्यांचा स्फोट झाला आहे. यामध्ये भाजपचे तब्बल 30 कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये हेलियमच्या फुग्यांचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेन्नईमध्ये भाजपच्यावतीने मोदींच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अंबात्तूर परिसरात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात तब्बल 2 हजार हेलियम गॅससे फुले आकाशात सोडण्यात येणार होते.

हे ही वाचा-एअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं

यावेळी हेलियम गॅसचा मोठा स्फोट झाला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नेतेमंडळीचं फुलांचा हार देऊन स्वागत केलं जात होतं. फटाकेही फोडण्यात येत होते. त्यावेळी हेलियम गॅसच्या फुग्यांचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: September 19, 2020, 1:44 PM IST

ताज्या बातम्या