VIDEO : आक्षेपार्ह विधानावर अलका लांबा भडकली, 'आप'च्या कार्यकर्त्यावर उचलला हात

VIDEO : आक्षेपार्ह विधानावर अलका लांबा भडकली, 'आप'च्या कार्यकर्त्यावर उचलला हात

हा प्रकार सुरू असताना पोलीस घटनास्थळी उपस्थित होते

  • Share this:

नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचे मतदान सुरू आहे. कायदा सुव्यवस्था असतानाही येथे हाणामारीची घटना घडल्याची माहिती समोर आहे. आप आणि कॉंग्रेस कार्य़कर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये कॉंग्रेस उमेदवार अलका लांबा यांनी आपच्या कार्यकर्त्याला कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. यानंतर हे प्रकरण इतकं चिघळलं की दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले. आपचे नेते संजय सिंह हे या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस असताना हा सर्व प्रकार घडला. यावेळी पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. प्रकरणात हाती आलेल्या माहितीनुसार आपच्या एका कार्यकर्त्याने अलका लांबा यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. ते ऐकून त्या चिडल्या आणि त्यांनी आपच्या कार्यकर्त्यावर हात उचलला. या प्रकरणात नेमकं काय़ घडलं याचा तपास सुरू असून निवडणूक आयोगाकडून याबाबत योग्य ती शिक्षा सुनावण्यात येईल. अलका लांबांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचे नाव धर्मेश असे आहे. अलका लांबा यंदा कॉंग्रेसच्या (Congress) तिकिटावरुन निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे (BJP) सुमन कुमार गुप्ता आणि आपचे (AAP) के.पीएस साहनी उभे आहेत.

अलका लांबा कोण आहेत?

माजी आप नेता अलका लांबा (Alka Lamba) घरवापसीनंतर आता चांदणी चौकातून कॉंग्रेसच्या (Congress) उमेदवार आहेत. त्या पूर्वी चांदणी चौक विधानसभेच्या आमदार राहिल्या आहेत. पहिल्यांदा त्या कॉंग्रेसमध्ये  (Congress) होत्या. त्यानंतर त्या आपमध्ये सहभागी झाल्या. त्यानंतर लांबा पुन्हा कॉंग्रेसमध्ये (Congress) सामील झाल्या. 1994 मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2020 12:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading